रात्र अठरावी
अळणी भाजी
The Unsalted Vegetable
रात्र अठरावी
राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, "राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वांत मोठा आनंद म्हणजे तुमच्या संगतीचा. श्यामच्या गोष्टीही ऐकावयास मिळतील. मला त्या फार आवडतात."
Raja and Ram had gone down to the river. The two of them sat on a slab of rock. Raja said, "Ram! I have no wish at all to leave this place. This river, this green woodland, these peacocks — seeing them all gives such joy. But the greatest joy of all is your company. And I get to hear Shyam's stories too. I love them so."
रात्र अठरावी
राम म्हणाला, "त्यांना गोष्टी म्हणावे, का प्रवचने म्हणावी; व्याख्याने म्हणावी; का आठवणी म्हणाव्या, काही समजत नाही. ऐकताना आनंद होतो, स्फूर्ती येते."
Ram said, "Whether to call them stories, or sermons, or lectures, or memories, I can't quite say. But hearing them brings joy, and a kind of inspiration too."
रात्र अठरावी
राजा म्हणाला, "श्याम बोलतो, त्यात त्याचे निर्मळ हृदय ओतलेले असते. म्हणून सांगण्याला एक विशेषच माधुरी असते. म्हणून कृत्रिमतेचा लवलेशही नसतो."
Raja said, "Whatever Shyam speaks, his own pure heart is poured into it. That's what gives his telling its particular sweetness. And that's why there isn't the slightest trace of artifice in it."
रात्र अठरावी
"अरे, पण कृत्रिमता असल्याशिवाय लोकांना आवडत नाही. आजकालचे लोक कृत्रिमतेचे भोक्ते आहेत. सगळाच रुपया शुद्ध चांदीचा असेल, तर बाजारात चालत नाही. त्यात थोडी अशुद्ध धातू मिसळावी लागते, तेव्हाच तो खण् वाजतो व व्यवहारात चालतो." राम म्हणाला.
"Ah, but without some artifice people don't take to a thing. These days people relish artifice. A rupee made of pure silver alone won't pass in the market. Some base metal has to be mixed in before it rings true and passes current in trade," Ram said.
रात्र अठरावी
"माझ्या मनात एक विचार आहे. तुला सांगू? तू हसशील." राजाने विचारले.
"There's a thought in my mind. Shall I tell you? You'll laugh," Raja asked.
रात्र अठरावी
"सांग, मी हसणार नाही. कोणाच्या खऱ्या भावनांना मी कधी हसत नाही." राम म्हणाला.
"Tell me, I won't laugh. I never laugh at anyone's true feelings," Ram said.
रात्र अठरावी
"श्यामच्या या आठवणी प्रसिद्ध केल्या तर? मुलांना वाचायला आवडतील, बायकांना वाचायला आवडतील; आईबापांस त्या उपयोगी पडतील; श्यामच्या सांगण्यात कोकणातील संस्कृती भरलेली आहे. या आठवणी म्हणजे एक सुंदर संस्कृतीचे वर्णनच आहे. नाही?" राजाने विचारले.
"What if these memories of Shyam's were published? Children would love reading them, women would love reading them, parents would find them useful; Shyam's telling is steeped in the culture of the Konkan. These memories are really a beautiful portrait of a whole culture, aren't they?" Raja asked.
रात्र अठरावी
"परंतु श्यामला ते आवडणार नाही. त्याला आत्मविश्वास नाही. कोण असल्या गोष्टी वाचायला तयार आहे? लोकांना भव्य, भडक पाहिजे. "त्यांना 'लैला-मजनू'च्या गोष्टी पाहिजेत." असे तो म्हणतो." राम म्हणाला.
"But Shyam wouldn't like that. He has no confidence in himself. 'Who's willing to read things like this?' he says. 'People want the grand, the sensational. They want stories of Laila-Majnu,' he says," Ram said.
रात्र अठरावी
त्यांचे बोलणे चालले होते, तोच घंटा झाली. प्रार्थनेची घंटा. दोघे मित्र आश्रमात जावयास निघाले. श्याम राजाची वाट पाहात होता. राजा व राम दोघे येताना त्याला दिसले. "आज मला नाही रे हाक मारलीत? अगदी दोघेच गेलात?" श्यामने विचारले.
They were still talking when the bell rang — the bell for prayer. The two friends set off for the ashram. Shyam was waiting for Raja. He saw Raja and Ram coming together. "You didn't call me today? Went off, just the two of you?" Shyam asked.
रात्र अठरावी
"तू वाचीत होतास, म्हणून नाही बोलाविले. दिवसभर इतर काम असते, थोडा वेळ वाचीत होतास तर अडथळा करू नये, असे वाटले." राजा म्हणाला.
"You were reading, so we didn't call you. There's other work all through the day — we thought, if you had a little time to read, we shouldn't disturb it," Raja said.
रात्र अठरावी
"अरे, मला तरी कोठे फारसे वाचावयास आवडते? विश्वाचा विशाल ग्रंथ वाचावा, मनुष्यांची जीवने वाचावी, हृदये वाचावी, त्यातील सुखदुःखे जाणून घ्यावी, हेच खरे वाचन, नाही का?" श्याम म्हणाला.
"Ah, but I don't much care for reading books anyway. To read the vast book of the universe, to read the lives of human beings, to read their hearts, to come to know the joys and sorrows within them — that's the true reading, isn't it?" Shyam said.
रात्र अठरावी
"श्याम, तू भरपूर वाचले आहेस, म्हणून असे म्हणतोस. सृष्टीचा ग्रंथ वाचावयास शिकावे लागते. शेतकऱ्याच्या आनंदाचे कवी वर्णन करतात; परंतु शेतकऱ्यास तो उपभोगता येत नाही. कारण त्याला ती दृष्टी नसते." राजा म्हणला.
"Shyam, you say that because you've already read a great deal. Learning to read the book of creation is itself something one has to learn. Poets describe the farmer's joy, but the farmer himself cannot taste that joy, because he lacks the eye for it," Raja said.
रात्र अठरावी
इतक्यात दुसरी घंटा झाली. सारे प्रार्थनेला बसले. प्रार्थना संपली व नेहमीप्रमाणे श्यामने आठवण सांगण्यास सुरुवात केली: "मित्रांनो! प्रत्यक्ष उदाहरणाने जे शिक्षण मिळते, ते शेकडो व्याख्याने ऐकून किंवा अनेक ग्रंथ वाचूनही मिळत नाही. कृती ही मुकेपणाने बोलते. शब्दांहूनही हे मुके परिणामकारक असते."
Just then the second bell rang. Everyone sat down for prayer. The prayer ended, and, as always, Shyam began telling his memory. "Friends! The teaching that comes from a living example is not to be had from hearing a hundred lectures, or from reading any number of books. Action speaks, though wordlessly, and that wordless speech is more effective than words themselves."
रात्र अठरावी
कसे जेवावे याचीसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे. माझे वडील नेहमी सांगावयाचे, "आपल्या पानाकडे पाहून जेवावे. पानावर वस्तू असता मागू नये. येईल तेव्हा घ्यावे. पंक्तीत सर्वांना वाढायला आणतील, तेव्हा आपणांसही मिळेल. हावरेपणा करू नये. शीत पानाच्या खाली सांडू नये, पानात काही टाकू नये. पानातील पदार्थांवर टीका करू नये. पानात गुंतवळ किंवा काही सापडले, तर निमूटपणे काढावे. वाच्यता करू नये. दुसऱ्यास वर करून दाखवू नये. कारण दुसऱ्यांना किळस येते. विषारी वस्तू सापडली तर मात्र सांगावे. पान कसे लख्ख करावे." या सांगण्याप्रमाणे वडील स्वतः वागत असत. मी अनेकांना जेवताना पाहिले आहे; परंतु माझ्या वडिलांचे जेवण झाल्यावर ताट जितके स्वच्छ व निर्मळ दिसे, तसे मी कोठेही पाहिले नाही. त्या ताटात कोणी जेवले आहे की नाही, हे समजण्याचीही मारामार पडे. त्यांच्या ताटाबाहेर एक शीतकण पडलेला दिसावयाचा नाही. माझ्या पानाभोवती जर शिते दिसली, तर रागावत व म्हणत, "मथुरीचे एक कोंबडे जेवेल, इतकी शिते सांडली आहेस. कर गोळा सारी." "अमुक वाईट, हे असेच झाले, याला चव नाही." वगैरे ते कधी बोलत नसत. त्यांना सारेच गोड लागे. त्यांचा एक शब्द ठरलेला असे. "राजमान्य!" त्यांना कोणी विचारावे, "भाजी कशी झाली आहे?" त्यांचे उत्तर ठरलेले असे. "राजमान्य." जेवणाची कोणतीही खोडी त्यांना नव्हती.
Even in how we eat, there is a culture among us. My father always used to say, "One should eat with one's eyes on one's own leaf-plate. If something is missing from the leaf, one should not ask for it — take it when it comes. When the servings are brought round to everyone in the row, you too will get your share. One shouldn't be greedy. Rice must not spill off the edge of the leaf, nothing should be thrown away on it. One shouldn't criticize what's on the leaf. If a bit of grit or something turns up in the food, remove it quietly — don't make a fuss of it, don't hold it up to show others, for it disgusts them. Only if it's something poisonous should you say so. And a leaf should be left licked clean." My father lived exactly by what he preached. I have watched a great many people eat, but nowhere have I seen a plate left as spotlessly, purely clean after a meal as my father's. One could hardly tell whether anyone had eaten off it at all. Not a single grain would ever be found lying outside the edge of his leaf. If ever grains of rice were scattered around my own leaf, he would grow cross and say, "You've scattered enough grains here to feed a whole chicken from Mathuri. Gather it all up." "This has turned out badly," or "This has no taste" — such things he never said. Everything tasted good to him. He had one fixed word for it: "Rajmanya" — fit for a king. If someone asked him, "How did the vegetable turn out?" the answer was always the same: "Rajmanya." He had not a single fussy habit about his food.
रात्र अठरावी
एके दिवशीची गोष्ट माझ्या चांगलीच ध्यानात राहिली आहे. रोज वडील घरच्या देवांची पूजा करून देवळास गेले, म्हणजे आम्ही पाटपाने घ्यावयास लागत असू. भाताशिवाय सर्व वाढून तयार ठेवीत असू. "आई, भाऊ आले. भाऊ आले. भात उकर." वडील देवळातून येताना गणपतीचे तीर्थ आणीत, ते आम्ही घेतले, म्हणजे जेवणे सुरू होत.
There's one day's story that has stayed clearly fixed in my memory. Every day, once Father had finished worshipping the household gods and had gone off to the temple, we would begin setting out the leaf-plates. Everything except the rice would be served and kept ready. "Aai, Bhau's come, Bhau's come — scoop out the rice." Father, coming back from the temple, would bring the tirtha of Ganapati, and once we had taken that, the meal would begin.
रात्र अठरावी
त्या दिवशी आम्ही जेवावयास बसलो. आईने रताळीच्या पाल्याची भाजी केली होती. माझ्या आईला कसलीही भाजी करावयास येत असे. भोपळीचा पाला, भेंडीचा कोवळा कोवळा पाला, सर्वांची ती भाजी करी. ती म्हणावयाची, "तिखट, मीठ व तेलाची फोडणी दिली, की सारे गोड लागते आणि खरेच गोड लागे. ती करी ते सारेच गोड लागे. जणू तिच्या हातात पाकदेवताच होती. केलेल्या पदार्थात हृदयातील सारी गोडी ओतून तो पदार्थ ती तयार करीत असे. माधुर्याचा सागर सर्वांच्या हृदयात ठेवलेलाच आहे.
That day we sat down to eat. Aai had made a sabzi of sweet-potato greens. My Aai could cook any vegetable there was — the leaves of the pumpkin vine, the tender leaves of the okra plant, she made a sabzi of all of them. She used to say, "Season it with chilli, salt, and a tempering of oil, and everything tastes sweet" — and it truly did taste sweet, whatever she made. It was as if the very goddess of flavour lived in her hands. Into whatever dish she prepared, she poured all the sweetness stored in her heart, and that was what made it taste so good. An ocean of sweetness lies stored in every human heart.
रात्र अठरावी
परंतु त्या दिवशी मजा आली. भाजी झाली होती मुळी अळणी! भाजीत मीठ घालावयाला आई विसरली होती. कामाच्या भरात राहून गेले घालावयाचे. परंतु वडील बोलत ना, म्हणून आम्हीही कोणी बोललो नाही. वडिलांचा संयम मात्र दांडगा. जणू आस्वादव्रतच ते चालवीत होते. आईने भाजी वाढावयास आणली म्हणजे म्हणावयाचे, "काय फाकडो झाली आहे भाजी!" पानातील मीठही त्यांनी भाजीला लावले नाही किंवा जास्त मागितले नाही. कारण आईला संशय आला असता. वडील भाजी खात होते, म्हणून आम्हीही थोडी थोडी खात होतो. आम्हीही मीठ मागितले नाही.
But that day something amusing happened. The sabzi had come out completely unsalted! In the rush of her work Aai had simply forgotten to put salt into it — it had slipped her mind. But since Father said nothing, none of us said anything either. Father's self-restraint, though, was formidable — it was as if he were keeping some vow to taste everything without complaint. Whenever Aai brought the sabzi round to serve, he would say, "My, hasn't this turned out splendidly!" He did not even take the salt from his own leaf and add it to the sabzi, nor did he ask for more, for fear Aai might grow suspicious. Since Father was eating the sabzi, we too ate a little of it each. We too asked for no salt.
रात्र अठरावी
आई मला म्हणाली, "तुला नाही का रे आवडली भाजी? खात नाहीस रोजच्यासारखी?"
Aai said to me, "Don't you like the sabzi today? You're not eating it the way you usually do."
रात्र अठरावी
मी उत्तर देण्याऐवजी वडील म्हणाले, "तो आता इंग्रजी शिकायला लागला ना, त्याला या पालेभाज्या कशा आवडतील?"
Instead of my answering, Father said, "He's started learning English now, hasn't he — how would he care for these leafy greens any more?"
रात्र अठरावी
मी म्हटले, "असे नाही काही. इंग्रजी शिकून मी वाईट होणार असेन, तर शिकवूच नका मला. कशाला शिकवता?"
I said, "That's not it at all. If learning English is going to spoil me, then don't teach it to me at all. Why teach it to me, then?"
रात्र अठरावी
वडील म्हणाले, "अरे, तुला राग यावा म्हणून म्हटले हो. तू जरा रागावलास म्हणजे बरे वाटते. याला फणसाची भाजी आवडते, होय ना ग? उद्या पाटीलवाडीहून आणीन हो. जून मिळाला तर उकडगरेच करा."
Father said, "Ah, I only said it to rile you up a bit. It does me good to see you a little angry. He does love jackfruit sabzi, though, doesn't he? I'll bring some from Patilwadi tomorrow. If it's ripe enough, make ukadgare out of it too."
रात्र अठरावी
आई म्हणाली, "आणावा. पुष्कळ दिवसांत फणसाची भाजी केली नाही." बोलणी अशी होत होत आमची जेवणे झाली. वडील ओटीवर गेले व विष्णुसहस्त्रनाम म्हणत शतपावली करू लागले. शतपावली झाल्यावर जानव्यासाठी चातीवर सूत कातीत बसले. खापराची चाती होती. प्रत्येकास सूत कातता आले पाहिजे, असा दंडक होता.
Aai said, "Do bring some. It's been many a day since I made jackfruit sabzi." Talking like this, we finished our meal. Father went out to the veranda and, reciting the Vishnusahasranama, took his hundred turns up and down. Once his walk was done, he sat down at the spinning wheel to spin thread for his janve, the sacred thread — it was a wheel made of baked clay. Everyone was expected to know how to spin thread; that was the rule of the house.
रात्र अठरावी
पसारा आटोपून आई जेवावयास बसली. ती घास घेते व भाजी खाऊन बघते, तो भाजी अळणी! मीठ नाही मुळी तीत. मी जवळच होतो.
Having cleared away the mess, Aai finally sat down to eat. She took a mouthful, tasted the sabzi — and found it unsalted! No salt in it at all. I was close by.
रात्र अठरावी
आई म्हणाली, "काय, रे, श्याम! भाजीत मीठ मुळीच नाही. तुम्ही कोणी बोललेही नाहीत. श्याम, सांगावे की नाही रे! अळणी कशी रे भाजी खाल्लीत?"
Aai said, "Shyam! There's no salt at all in this sabzi. And none of you said a word! Shyam, you ought to have told me! However did all of you eat such unsalted sabzi?"
रात्र अठरावी
मी म्हटले, "भाऊ बोलले नाहीत, म्हणून आम्हीही बोललो नाही!"
I said, "Bhau didn't say anything, so none of us said anything either!"
रात्र अठरावी
आईला वाईट वाटले. "मिठाशिवाय भाजी खाल्लीत रे साऱ्यांनी." ती म्हणाली. तिला रुखरुख लागली. ती पुन्हा म्हणाली, "तरीच तू खाल्ली नाहीस. नाही तर बचकभर भाजी तूच खायचा, निम्मी तूच संपवायचा. तुला गुलामा, भाजी हवी पुष्कळ. माझ्या लक्षात तेव्हाच आले पाहिजे होते. परंतु आता काय बोलून?"
Aai felt bad. "All of you ate the sabzi without any salt in it at all," she said. It nagged at her. She said again, "No wonder you didn't eat any of it. Otherwise you'd have eaten a whole fistful yourself, finished off half of it on your own. You're such a glutton for sabzi, you rascal — I should have noticed it myself, right then. But what use is there in saying so now?"
रात्र अठरावी
आपली मोठी चूक झाली, असे आईला वाटले. जी वस्तू दुसऱ्याला करून द्यावयाची, ती चांगली करून द्यावी. जो पदार्थ करून द्यावयाचा तो चांगला करून द्यावा. मग भाजी असो, की काही असो. आपण अळणी भाजी वाढली, हयगय केली, निष्काळजीपणा केला, कामात दक्षता ठेवली नाही, हे बरे झाले नाही, असे आईला वाटले. तिला रुखरुख लागली.
Aai felt she had made a great error. Whatever one prepares for someone else, one should prepare well. Whatever dish one makes for another, one should make it properly, whether it is sabzi or anything else. That she had served an unsalted sabzi, had been careless, had been negligent, had not taken proper care with her work — all this seemed to Aai a poor showing on her part, and it nagged at her.
रात्र अठरावी
बरे, आईला वाईट वाटू नये, म्हणून वडील बोलले नाहीत. इतक्या खटपटीने चुलीजवळ धुरात बसून स्वयंपाक केला, तो गोड करून खावा, त्यात दोष पाहू नये. स्वयंपाक करणाऱ्याचे मन दुखवू नये, ही वडिलांची दृष्टी.
But then, so that Aai would not feel bad, Father had said nothing at all. After all that trouble, sitting in the smoke by the hearth to cook the meal, one ought to eat it gladly and not go hunting for faults in it. One should never hurt the feelings of the one who has cooked — that was how Father saw it.
रात्र अठरावी
मित्रांनो! दुसऱ्याचे मन दुखवू नये, म्हणून जिभेवर ताबा ठेवून अळणी भाजीही मिटक्या मारून खाणीरे माझे वडील श्रेष्ठ, का अळणी भाजी कशी हातून झाली, का, रे, तुम्ही कोणी सांगितले नाही, असे म्हणणारी, चांगला पदार्थ हातून झाला नाही, म्हणून मनाला लावून घेणारी, हळहळणारी, माझी आई श्रेष्ठ? दोघेही थोर व श्रेष्ठ. हिंदू संस्कृती, संयम व समाधान यांवर उभारलेली आहे; त्याचप्रमाणे कर्मकुशलतेवरही उभारलेली आहे. हे दोन्ही धडे माझे आईबाप मला देत होते.
Friends! Which was the greater — my father, who kept a rein on his own tongue and ate even an unsalted sabzi with every appearance of relish, all so as not to hurt another's feelings; or my Aai, who cried, 'Why did none of you tell me?', who took it so much to heart that a good dish had gone wrong by her own hand, who fretted and grieved over it? Both were great, both were noble. Hindu culture is built upon restraint and contentment — and, just as much, upon skill and diligence in one's work. These were the two lessons my parents were forever teaching me.