रात्र सतरावी
स्वावलंबनाची शिकवण
The Lesson of Self-Reliance
रात्र सतरावी
"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं,... अनन्तं वासुकिं शेषं,... अच्युतं केशवं विष्णु..., अशी दोन-चार लहान लहान स्तोत्रेच येत होती. 'अनन्तं वासुकिं' हे नागाचे स्तोत्र आहे. ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकविले होते. परंतु रामरक्षा हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णुसहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असे. त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती; परंतु त्यांनी ती मला शिकविली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये, याचे मला वाईट वाटे."
"As a child I read a great many pothis and puranas, but I did not know many Sanskrit stotras. Pranamya shirasa devam... Anantam Vasukim Shesham... Achyutam Keshavam Vishnum... — only two or three such short stotras did I know. 'Anantam Vasukim' is the stotra of the serpent gods; my grandfather had taught it to me one Nagpanchami day. But that wonderful stotra, the Ramraksha, I did not know at all. I used to recite the Vishnusahasranama every day from Father's book, and so, in time, that too had become fixed in my memory. Father knew the Ramraksha, but he never taught it to me. We did not even own a copy of the Ramraksha. Being, as a child, a devotee of Ram, it grieved me that I did not know the Ramraksha."
रात्र सतरावी
आमच्या शेजारी गोविंदभटजी परांजपे राहात होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज एक-दोन श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली, म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला राग वाटे व भास्करचा राग येई. आपला अहंकार दुखावला गेला की, आपणांस राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणारांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिणकस ठरलो, तर आपणाला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबैंगण असतो, त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे, असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते, याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवचा, स्तोत्र वगैरे म्हणण्याच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा ऐटीने म्हणे. त्यामुळे मला जास्तच चीड येई. हा आपणांस मुद्दाम चिडविण्यास ऐटीने येतो, असे पाहून मी फार संतापे.
Our neighbours were the Paranjapes — Govindbhatji and his family. One of his sons, Bhaskar, owned a copy of the Ramraksha. He was memorizing a verse or two of it every day. When evening came, Bhaskar would come over to our house and recite those verses. Hearing them made me angry, and angry at Bhaskar too. It is when our pride is wounded that anger rises in us. We are forever measuring ourselves against the people around us, and when in that measuring we come off the lesser, anger follows. A short, stunted man, seeing a tall one, feels resentment toward him. Seeing that someone else is cleverer than ourselves makes us unhappy. That Bhaskar knew the Ramraksha and I did not was galling to me, and he took to coming over on purpose, just at the hour for reciting lessons and stotras, and reeling off those verses with a touch of swagger. That made me all the angrier still. Seeing that he came, deliberately, with that air, just to provoke me, I would grow quite furious.
रात्र सतरावी
एके दिवशी भास्कर मला म्हणाला, "श्याम! आता दहाच श्लोक माझे राहिले. आणखी पाच-सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कोठे येते?"
One day Bhaskar said to me, "Shyam! Only ten verses of mine are left now. In another five or six days I'll have the whole Ramraksha by heart. How much do you know of it?"
रात्र सतरावी
मी एकदम संतापलो व चिरडीस गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो, "भाश्या! पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला. तुम्हांस येते ते आहे माहीत आम्हांला. एवढी ऐट नको. तुझ्याजवळ पुस्तक आहे म्हणून. माझ्याजवळ असते तर तुझ्याआधी पाठ केली असती. मोठा आला आहे पाठ करणारा. जा आपल्या घरी. येऊ नको आमच्याकडे. मी मारीन नाही तर."
I flared up at once and lost my temper completely. I rushed at him and shouted, "Bhashya! Just you come here again to taunt me like that! We know well enough what you know. No need for such airs. It's only because you have the book. If I had one, I'd have learned it before you did. Some great scholar you are! Go home. Don't come to our house. I'll hit you, or worse."
रात्र सतरावी
आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, "काय रे झाले भास्कर? श्यामने का तुला मारले?"
Hearing our shouting and quarrelling, Aai came outside. She asked Bhaskar, "What's happened, Bhaskar? Did Shyam hit you?"
रात्र सतरावी
भास्कर म्हणाला, "श्यामच्या आई! मी नुसते म्हटले, की आणखी पाच-सहा दिवसांनी सारी रामरक्षा माझी पाठ होईल, तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे, तुला मारीन, नाही तर चालता हो."
Bhaskar said, "Shyamchi Aai! I only said that in another five or six days I'll have the whole Ramraksha by heart, and he flew into a rage and rushed at me shouting that he'd hit me, or else I'd better clear off."
रात्र सतरावी
आई माझ्याकडे वळून म्हणाली, "होय का रे श्याम? असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच चारदा त्यांच्याकडे जाशील."
Aai turned to me and said, "Is that so, Shyam? Is that how one speaks to a neighbour's child? You'll be running to their house yourself soon enough."
रात्र सतरावी
मी रागातच म्हटले, "तो मला मुद्दाम हिणवायला येतो. "तुला कोठे येते रामरक्षा?" असे मला हिणवीत तो म्हणाला. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसा अगदी साळसूद. स्वतःचे काही सांगत नाही. खोटारडा कुठला."
Still angry, I said, "He comes on purpose to taunt me. 'You don't know the Ramraksha, do you,' he said, mocking me like that. Ask him whether he said it or not. Making himself out so innocent. He never mentions his own doings. What a liar he is."
रात्र सतरावी
आई म्हणाली, "मला रामरक्षा येते व तुला येत नाही, असे त्याने म्हटले, यात रे काय त्याने चिडविले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखविला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते, म्हणून तो तुला चिडवितो. रामविजय, हरिविजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करीत?"
Aai said, "He said, I know the Ramraksha and you don't — what mockery is there in that? He only told you the truth. Why be angry that someone points out where you fall short? Better to get rid of the shortcoming instead. Bhaskar wants you to learn the Ramraksha too, that's why he teases you about it. You read Ramvijay and Harivijay over and over — why not learn the Ramraksha by heart as well?"
रात्र सतरावी
मी म्हणालो, "भाऊ शिकवीत नाहीत व मजजवळ पुस्तक नाही."
I said, "Bhau doesn't teach it to me, and I don't have a book."
रात्र सतरावी
आई म्हणाली, "भास्करचे पुस्तक आहे ना, ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा. नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर."
Aai said, "Bhaskar has a book, doesn't he — go and borrow it whenever he doesn't need it. Or copy it out from his book and learn it that way."
रात्र सतरावी
भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात काही निश्चय करीत होतो. येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यावयाची, असे मी ठरविले. मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली. लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहात बसलो. रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही, म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दांत म्हटले, "भीमाताई! भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यावयाला सांगता का? मी रामरक्षा उतरून घेणार आहे. मला पाठ करावयाची आहे. आज सुट्टी आहे. मी सबंध दिवसभर लिहून काढीन."
Bhaskar went off home, and I set about making up my mind. I decided that on the coming Sunday I would copy out the whole Ramraksha. I took some plain paper and stitched it into a notebook. I made my pen ready and sat waiting for Sunday to dawn. The moment it did, I went straight to Bhaskar's house. Fearing Bhaskar himself might refuse the book, I went first to his mother and said to her sweetly, "Bhimatai! Will you tell Bhaskar to let me have the Ramraksha book just for today? I mean to copy it out — I want to learn it by heart. It's a holiday today. I'll write the whole thing out in one day."
रात्र सतरावी
भीमाताईंनी भास्करला हाक मारिली व त्या म्हणाल्या, "भास्कर! श्याम एवढा मागतो आहे, तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम! शाईचे डाग वगैरे नको, हो, पाडू. नीट जपून वापर. दे रे त्याला." परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणाला, "आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करावयाचे राहील."
Bhimatai called Bhaskar and said, "Bhaskar! Shyam is asking so earnestly — give him the book just for today. He won't tear it or spoil it. Shyam! Mind you don't get ink stains on it. Use it carefully. Go on, give it to him." But Bhaskar was not willing. He said, "Since it's a holiday today, I mean to finish learning the rest of the Ramraksha myself. I won't give him the book. My own work will be left undone."
रात्र सतरावी
भीमाताई भास्करला रागावल्या, "तुझे अगदी आजच अडले आहे, नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचा श्याम ना? त्याच्याजवळ, कसली अढी दाखवितोस? दे त्याला, नाही तर बघ." भीमाताईंचा राग भास्करला माहीत होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले.
Bhimatai scolded Bhaskar, "It has to be today of all days, does it! Learn the rest tomorrow or the day after. He's your own neighbour, this Shyam — what grudge are you holding against him? Give it to him, or you'll see." Bhaskar knew Bhimatai's temper. Fuming, he brought the book and gave it to me.
रात्र सतरावी
मी ते पुस्तक घेऊन घरी आलो. लिहावयास एकांत मिळावा, म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो! गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही, सारे सामान सिद्ध होते. रामरक्षा लिहावयास सुरुवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहावयास बसलो. लिहिणे संपले, त्या वेळेस मला किती आनंद झाला होता, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा! माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदादिकांच्या हस्तलिखित पोथ्या किती तरी होत्या. ठळक, वळणदार अक्षर, कोठे डाग नाही, अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या-पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर, त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील किती तरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतःसाठी स्वतः लिहून घेतले होते, ते दिले आहे. त्या काळात आळस माहीत नव्हता. छापखाने नव्हते. पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस बोलावून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत! समर्थांच्या मठांतून ग्रंथालये असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने गल्लोगल्ली आहेत, पुस्तकांचा सुकाळ आहे; तरीही ज्ञान बेताबाताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले, असे दिसत नाही. परंतु ते जाऊ दे.
I took the book and came home. To find some quiet place to write, I went and sat down in the cattle shed! The cattle had gone off to graze. Inkpot, pen, notebook — everything was ready. I began copying out the Ramraksha. By the time of the midday meal, most of it was done. As soon as the meal was over, I sat down again to finish. When I was done, how happy I felt, what a sense of fulfilment! The Ramraksha, copied out in my own hand! At my Aai's maher there had been a great many old handwritten pothis of the Vedas and such texts. I had seen those pothis — bold, flowing letters, without a stain anywhere. In the old days, throughout Hindustan, pothis and books were copied out entirely by hand; the whole world once followed that same custom, and whoever had handwriting as fine as pearls was held in honour. In Moropant's life story it is recorded how many manuscripts he had copied out for himself in Kashi, in his own hand. In those days idleness was unknown. There were no printing presses. Books were scarce. Moropant would send for books from Kashi to Baramati, have them copied out by hand, and then send them carefully back again! At the Samarth's mathas there were whole libraries, thousands upon thousands of pothis kept there in manuscript. Today printing presses stand on every street corner, books are plentiful — and yet knowledge remains just as poor as ever. Man's head is still nothing but an empty box. Life does not seem to have grown any better or more cultured for it, any richer in humanity, in honesty and diligence, in sacrifice and love. But let that be.
रात्र सतरावी
मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले.
I truly felt very happy that day. I took Bhaskar's book back to him.
रात्र सतरावी
"काय, रे श्याम! इतक्या लवकर लिहून झाले?" भीमाताईने विचारले.
"What, Shyam! Finished writing it out already?" Bhimatai asked.
रात्र सतरावी
मी म्हटले, "हो! ही पाहा वही. भास्करला दुपारून पाठ करावयास पुस्तक हवे, म्हणून मी सारखा लिहितच होतो."
I said, "Yes! Here, look, the notebook. Bhaskar needed the book back by afternoon to learn from, so I just kept writing without stopping."
रात्र सतरावी
"वा! छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर, म्हणजे भास्कर चिडवणार नाही." ती म्हणाली.
"Well now! Your handwriting is lovely. Learn it by heart now, and Bhaskar won't be able to tease you any more," she said.
रात्र सतरावी
मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचीत होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकावयाची, असे मी ठरविले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करावयाचे, असे मनात मी योजिले. रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो, देवच जाणे. परंतु वेळ मिळताच वही हातांत घेत असे, मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता.
I came home and kept reading over the Ramraksha again and again. I resolved to have it memorized within the week. I planned to surprise Father completely, the following Sunday. God alone knows how many times a day I recited the Ramraksha to myself. Whenever I found a spare moment I would take up the notebook. I knew no Sanskrit grammar, yet I understood a good deal of the meaning, and learning it by heart filled me with joy.
रात्र सतरावी
शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली होती. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व मी त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवितो, असे मला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले व हात-पाय धुऊन घरात गेले.
At last the second Sunday came. I had the whole Ramraksha by heart. All that evening I was impatient for Father to come home, wondering when at last I would get to recite the Ramraksha for him. Evening fell at last. The lamps were lit inside the house, and the stars began to twinkle in the sky. I paced up and down in the courtyard, going over the Ramraksha silently to myself. Father came home, and after washing his hands and feet, went inside.
रात्र सतरावी
त्यांनी विचारले, "काय, श्याम! परवचा, स्तोत्र वगैरे झाले का सारे?"
He asked, "Well, Shyam! Have you finished your parvacha, your stotras, all of it?"
रात्र सतरावी
मी एकदम म्हटले, "हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का?"
I said at once, "Yes, all of it's done. Will you hear me recite my Ramraksha?"
रात्र सतरावी
ते एकदम म्हणाले, "तू कधी शिकलास? आणि कोणी शिकविली?"
He said at once, "When did you learn it? And who taught you?"
रात्र सतरावी
मी सांगितले, "भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली."
I told him, "I copied it out from Bhaskar's book and learned it by heart."
रात्र सतरावी
"बघू दे तुझी रामरक्षेची वही." ते कौतुकाने म्हणाले.
"Let me see this notebook of yours," he said, full of admiration.
रात्र सतरावी
मी माझी वही त्यांच्यापुढे ठेविली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कोठे नव्हता. परंतु अक्षर किरटे होते.
I set my notebook before him. The pages were neatly ruled, without a stain anywhere. But the lettering was rather cramped.
रात्र सतरावी
वडील म्हणाले, "शाबास, अक्षर नीट आहे; परंतु जरा लांबट काढावे. असे बुटके काढू नये. म्हण पाहू आता."
Father said, "Well done — the letters are neat, but make them a little taller. Don't squeeze them so short. Now let's hear it."
रात्र सतरावी
मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखविली. वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरविला. त्यातील आनंद-तो कसा वर्णन करून सांगता येईल?
I recited the whole Ramraksha straight through without a stumble. Father ran his hand over my back. How could I describe the joy of that moment?
रात्र सतरावी
जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. "आई, बघ; कशी आहे माझी वही? मी तुला कोठे दाखवली होती? मी तुझ्यावर रागावलो होतो." असे प्रेमाने म्हटले.
After the meal, Father went outside, and I went over to Aai. "Aai, look — see my notebook? I never showed it to you, did I? I was angry with you," I said, with affection.
रात्र सतरावी
आई म्हणाली, "तू उतरून घेतलेस, हे मला माहीत होते. तुझे अक्षर बघावे, म्हणून कितीदा मनात येत होते. परंतु तू आपण होऊन दाखविशील, अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी होतीस! आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागावेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करील, तितके कोण करील? आपला मुलगा गुणी होत आहे, याचा आनंद आईला किती होत असेल? तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास. रोज वाटे, श्याम आज आपली वही मला दाखवील व मी त्याला पोटाशी धरीन. परंतु आईवर रागावलास! होय ना! आईला वही दाखविली नाहीस. बरे, पण जाऊ दे. आता झाली की नाही रामरक्षा पाठ? पुस्तक नाही, म्हणून रडत बसला असता, तर झाली असती का? अरे, आपल्याला हात, पाय, डोळे सारे आहे. स्वतःच्या पायांवर उभे राहावे. ज्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधी होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव. दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते, या गर्वाने कोणाला हिणवू नकोस. कोणाला तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे." असे बोलून आईने वही हातात घेतली. तिला आनंद झाला. कृतार्थता वाटली. "या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले, की झाली खरी रामरक्षा! तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील, हो श्याम! कारण तू स्वतः कष्ट करून, सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस!"
Aai said, "I knew all along you had copied it out. How many times it crossed my mind to look at your handwriting! But I kept hoping you would show it to me of your own accord. You ought to have shown it to me that very Sunday! Whom does one show one's good work to, if not one's Aai? Aai will scold you for what's wrong, but for what's good, who will praise it as wholeheartedly, as truly from the heart, as your Aai? How happy an Aai must be, seeing her son grow into someone worthy! And that happiness of mine you kept hidden from me for eight whole days. Every day I thought, today Shyam will show me his notebook, and I'll gather him to my heart. But you stayed angry at your Aai! Isn't that so! You never showed your Aai the notebook. Well, never mind, let it pass. Is the Ramraksha learnt by heart now, or not? If you had sat there crying just because you had no book, would it ever have got done? See, you have hands, you have feet, you have eyes — everything. One must stand on one's own two feet. Whoever has intelligence, whoever has resolve in his mind, has everything he needs. Keep working just like this, and grow into someone. Never become dependent on others. But remember one thing besides: never taunt anyone out of pride that you know more than they do. Never look down on anyone. Give to another, too, from what you have, and help him become as capable as you." So saying, Aai took the notebook in her hands. She was overjoyed. She felt a deep sense of fulfilment. "Once there's a picture of Ram on this first page, the Ramraksha will truly be complete! Mohan the Marwari will give you one — they come printed on the cloth in his shop. Ask him for it and paste it in. God will love you dearly today, Shyam! For you took the trouble yourself, wrote the whole thing out with your own hand, and learned his stotra by heart!"