तो अंतरात्मा सकळांचा । देवदानवमानवांचा ।
चत्वारखाणीचत्वारवाणीचा । प्रवर्तकु ॥ ३ ॥
तो देव, दानव आणि मानव या सर्वांचा अंतरात्मा आहे. चार खाणींतून (अंडज, स्वेदज, उद्भिज्ज, जरायुज) निर्माण होणाऱ्या सर्व सृष्टीचा आणि चार प्रकारच्या वाणीचाही तोच प्रवर्तक आहे.