येकदां मेल्यानें सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना ।
आपणास मारी वांचविना । तो आत्महत्यारा ॥ ९ ॥
एकदा मेल्याने सुटका होत नाही, पुनःपुन्हा जन्मोजन्मी यातना भोगाव्या लागतात; जो स्वतःला (आळसाने, अविवेकाने) असे मारतो आणि वाचवत नाही, तो स्वतःचाच घातकी ठरतो.