अंतरात्मा नस्तां वायो कैंचा । विकार नस्तां अंतरात्मा कैंचा ।
निर्विकारीं विकार कैंचा । बरें पाहा ॥ १७ ॥
अंतरात्म्याशिवाय वायू तरी कुठून येणार? आणि विकार, चलनवलन नसेल तर अंतरात्मा तरी कुठून उद्भवणार? आणि जे मुळात निर्विकार आहे, तेथे विकार तरी कसा असणार, हे नीट पाहा.