निश्चये बैसे वस्तूकडे । तरी ज्ञानमार्गेंहि सामर्थ्य चढे ।
कोणीयेक येकांत मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥
निश्चयाने मन वस्तूकडे म्हणजे परब्रह्माकडे लागले, तर ज्ञानमार्गानेही सामर्थ्य वाढतच जाते. पण कोणत्याही एका बाजूला अती जाऊन दुसरी बाजू मोडेल, असे करू नये.