न मनी तीर्थ न मनी क्षेत्र । न मनी वेद न मनी शास्त्र ।
पवित्रकुळीं जो अपवित्र । तो येक पढतमूर्ख ॥ २४ ॥
तीर्थाला मानत नाही, क्षेत्राला मानत नाही, वेदांना मानत नाही, शास्त्रांनाही मानत नाही, आणि पवित्र कुळात जन्म घेऊनही जो अपवित्रच राहतो, तो एक पढतमूर्ख होय.