सत्त्वगुणामुळेच भगवद्भक्ती साध्य होते, सत्त्वगुणामुळेच ज्ञानप्राप्ती होते, आणि सत्त्वगुणामुळेच सायुज्य मुक्ती, म्हणजे परमेश्वराशी ऐक्यरूप मोक्ष, प्राप्त होते.
दासबोध : दशक दुसरा : समास सातवा - सत्वगुण
ऐसी सत्वगुणाची स्थिती । स्वल्प बोलिलें येथामती ।
सावध होऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ८८ ॥
अशी सत्त्वगुणाची स्थिती आहे; ती आपल्या बुद्धीप्रमाणे थोडक्यात सांगितली. श्रोत्यांनी सावध राहून पुढेही लक्ष द्यावे.