ढाळेंचि काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्वदा ।
तेथें पीळपेंचाची आपदा । आडळेचिना ॥ ९ ॥
काही गोष्टी माणसाच्या अंगच्या स्वभावानेच सहज घडतात, त्या कितीही जपजाप्य, प्रयत्न केले तरी घडत नाहीत. जिथे हा सहजस्वभाव असतो, तिथे कसलीही ओढाताण, संकट येतच नाही.