जयास कोणाचें सोसेना । तयाची निःकांचन वासना ।
धीकारिल्या धीकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥
कोणाचाही तिटकारा त्याला सहन होत नाही, म्हणजे तो कोणाचाच तिटकारा करत नाही, त्याची वासना अगदी निर्लोभ, निष्कांचन असते. लोकांनी धिक्कारले तरी तो कधी उलट धिक्कार करत नाही - तोच खरा महापुरुष होय.