अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट । आर्कुलीं वेलांड्या ॥ ३ ॥
प्रत्येक अक्षर आणि मात्रा नीटनेटकी असावी, अक्षरांमधील अंतर योग्य असावे, काने नीट असावेत, आडव्या मात्राही नीट काढाव्यात आणि वेलांट्यांची वळणेही नेमकी असावीत.