ज्याच्या ठायी या तिन्ही खुणा (ब्रह्मज्ञान, सदाचार, आणि योग्य उपदेश) एकवटलेल्या असतात, तोच खरा सुलक्षणी गुरु; मुमुक्षूने अत्यंत आदराने त्याच्याच शरण जावे.
दासबोध : दशक पाचवा : समास दुसरा - गुरुलक्षण
अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता । परी विषईं लोलंगता ।
ऐसिया गुरूचेनि सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१॥
अद्वैताचे निरूपण करण्यात अगाध वक्तृत्व असले, पण मनात विषयासक्ती असेल, तर अशा गुरूकडून खरे सार्थक कधीच होत नाही.