तींहीं वाचा अंतरीं आलें । तें वैखरिया प्रगट केलें ।
म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें । तें शारदागुणें ॥ १४॥
त्या तीन वाणींद्वारे (परा, पश्यंती, मध्यमा) जे अंतःकरणात उमटते, ते वैखरी वाणीद्वारे प्रगट होते. म्हणून जे काही कर्तृत्व घडते, ते शारदेच्याच गुणामुळे घडते.