चतुर्युगसहस्राणि दिनमेकंपितामहम् ।
पितामहसहस्राणि विष्णोर्घटिकमेव च ॥
विष्णोरेकः सहस्राणि पलमेकं महेश्वरम् ।
महेश्वरसहस्राणि शक्तेरर्धं पलं भवेत् ॥
ऐशा अनन्त शक्ती होती । अनंत रचना होती जाती ।
तरी अखंड खंडेना स्थिति । परब्रह्माची ॥ ५॥
याप्रमाणे संस्कृत श्लोकांत हा काळाचा क्रम सांगितला आहे; अशा अनंत शक्ती होऊन गेल्या, अनंत सृष्टिरचना निर्माण होऊन नाश पावल्या, तरीही परब्रह्माची अखंड स्थिती कधी खंडित होत नाही.