निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा ।
चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्वरु ॥ १ ॥
निश्चल अशा ब्रह्मामध्ये चंचल आत्मतत्त्व प्रगटते, तोच सर्वांहून श्रेष्ठ परमात्मा होय. तो चैतन्यरूप साक्षी, ज्ञानस्वरूप असून ऐश्वर्य, वीर्य, यश, श्री, ज्ञान व वैराग्य या सहा गुणांनी संपन्न असा ईश्वर आहे.