दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य । याचा करूं नये नास ।
दास म्हणे सावकास । विवेक करावा ॥ १ ॥
हे शरीर दुर्लभ आहे आणि हे आयुष्यही दुर्लभ आहे; त्याचा नाश करू नये. दास (रामदास) म्हणतो, शांतपणे विवेकाने वागावे.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य । याचा करूं नये नास ।
दास म्हणे सावकास । विवेक करावा ॥ १ ॥
This body is rare, and this life too is rare; one must not waste it. The servant (Ramdas) says: act with patience and discernment.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
न पाहातां उत्तम विवेक । अवघा होतो अविवेक ।
अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥
उत्तम विवेक न पाहता वागले की सगळे अविवेकानेच घडते; अशा अविवेकामुळे माणूस रंकासारखा (दीन) दिसू लागतो.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
न पाहातां उत्तम विवेक । अवघा होतो अविवेक ।
अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥
Without looking to sound discernment, everything one does becomes indiscretion; through such indiscretion a person comes to look as wretched as a pauper.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
हें आपलें आपण केलें । आळसें उदास नागविलें ।
वाईट संगतीनें बुडविलें । देखत देखतां ॥ ३ ॥
हे आपणच आपल्या हाताने केलेले आहे; आळसाने आणि उदासीनतेने आपल्याला लुटले, वाईट संगतीने डोळ्यादेखत बुडवले.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
हें आपलें आपण केलें । आळसें उदास नागविलें ।
वाईट संगतीनें बुडविलें । देखत देखतां ॥ ३ ॥
This is what one has done to oneself; laziness and indifference have stripped one bare, and bad company has drowned one right before one's own eyes.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
मूर्खपणाचा अभ्यास जाला । बाष्कळपणें घातला घाला ।
काम चांडाळा उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥
मूर्खपणाचाच अभ्यास झाला, बडबडेपणाने स्वतःवर घाला घातला; तरुणपणी दुष्ट कामवासना उफाळून आली.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
मूर्खपणाचा अभ्यास जाला । बाष्कळपणें घातला घाला ।
काम चांडाळा उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥
One's only practice became foolishness, and idle chatter dealt oneself a blow; in youth the wicked demon of lust rose up.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
मूर्ख आळसी आणि तरुणा । सर्वांविषीं दैन्यवाणा ।
कांहीं मिळेना कोणा । काये म्हणावें ॥ ५ ॥
मूर्ख, आळशी आणि (नुसताच) तरुण - असा माणूस सर्व बाबतीत दैन्यवाणा ठरतो; त्याला कशातच काही मिळत नाही, याला काय म्हणावे!
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
मूर्ख आळसी आणि तरुणा । सर्वांविषीं दैन्यवाणा ।
कांहीं मिळेना कोणा । काये म्हणावें ॥ ५ ॥
A fool, a lazy man, and mere youth - such a person turns out wretched in every respect; he gains nothing anywhere - what is one to say of him!
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्नवस्त्र तेंहि नाहीं ।
उत्तम गुण कांहींच नाहीं । अंतर्यामीं ॥ ६ ॥
जे जे हवे ते ते त्याच्यापाशी नाही, अन्नवस्त्रही नाही आणि अंतर्यामी एकही उत्तम गुण नाही.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्नवस्त्र तेंहि नाहीं ।
उत्तम गुण कांहींच नाहीं । अंतर्यामीं ॥ ६ ॥
Whatever he needs, he lacks; he lacks even food and clothing, and within him there is not a single good quality.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
बोलतां येना बैसतां येना । प्रसंग कांहींच कळेना ।
शरीर मन हें वळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥
त्याला नीट बोलताही येत नाही, नीट बसताही येत नाही, प्रसंग ओळखणे कळत नाही आणि शरीर-मन अभ्यासाकडे वळतच नाही.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
बोलतां येना बैसतां येना । प्रसंग कांहींच कळेना ।
शरीर मन हें वळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥
He cannot even speak properly or sit properly, he has no sense of occasion, and neither body nor mind will turn toward practice.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
लिहिणें नाहीं वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं ।
नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणें ॥ ८ ॥
लिहिणे नाही, वाचणे नाही, विचारणे नाही, सांगणे नाही; बडबडेपणामुळे नेमस्तपणाचा अभ्यासच नाही.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
लिहिणें नाहीं वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं ।
नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणें ॥ ८ ॥
No writing, no reading, no asking, no telling; lost in idle talk, he has no discipline of regular practice at all.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
आपणांस कांहींच येना । आणी सिकविलेंहि मानेना ।
आपण वेडा आणि सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥
स्वतःला काहीच येत नाही आणि शिकवलेलेही मानत नाही; स्वतः वेडा असून सज्जनांवरच दोष ठेवतो.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
आपणांस कांहींच येना । आणी सिकविलेंहि मानेना ।
आपण वेडा आणि सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥
He himself knows nothing, and will not even accept what is taught; being foolish himself, he blames good people instead.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
अंतरी येक बाहेरी येक । ऐसा जयाचा विवेक ।
परलोकाचें सार्थक । कैसें घडे ॥ १० ॥
अंतरी एक आणि बाहेर एक, असा ज्याचा व्यवहार असतो, त्याचे परलोकाचे सार्थक कसे घडणार?
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
अंतरी येक बाहेरी येक । ऐसा जयाचा विवेक ।
परलोकाचें सार्थक । कैसें घडे ॥ १० ॥
One thing within and another outside - with such double-dealing, how can the good of the world beyond ever be secured?
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
आपला संसार नासला । मनामधें प्रस्तावला ।
तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवेकाचा ॥ ११ ॥
आपला संसार बिघडला हे जेव्हा मनाला जाणवेल, तेव्हा तरी विवेकाचा अभ्यास केला पाहिजे.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
आपला संसार नासला । मनामधें प्रस्तावला ।
तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवेकाचा ॥ ११ ॥
Once one realizes in the mind that one's own life has gone to ruin, at least then one must take up the practice of discernment.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
येकाग्र करूंनिया मन । बळेंचि धरावें साधन ।
येत्नीं आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥
मन एकाग्र करून बळेच साधन धरावे; अशा प्रयत्नात आळसाचे दर्शनही होऊ देऊ नये.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
येकाग्र करूंनिया मन । बळेंचि धरावें साधन ।
येत्नीं आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥
One should concentrate the mind and forcibly take up the practice; in such effort, laziness should never be allowed to show its face.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
अवगुण अवघेचि सांडावे । उत्तम गुण अभ्यासावे ।
प्रबंद पाठ करीत जावें । जाड अर्थ ॥ १३ ॥
सर्व अवगुण सोडून द्यावेत, उत्तम गुणांचा अभ्यास करावा आणि गहन अर्थ असलेले ग्रंथ पाठ करत जावेत.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
अवगुण अवघेचि सांडावे । उत्तम गुण अभ्यासावे ।
प्रबंद पाठ करीत जावें । जाड अर्थ ॥ १३ ॥
One should give up all bad qualities entirely, cultivate good ones, and go on memorizing texts of weighty meaning.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
पदप्रबंद श्लोकप्रबंद । नाना धाटी मुद्रा छंद ।
प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥
पदरचना, श्लोकरचना, नाना ढंग-मुद्रा-छंद - हे सर्व शिकावे; प्रसंगाचे ज्ञान झाले की त्यातूनच आनंद मिळतो.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
पदप्रबंद श्लोकप्रबंद । नाना धाटी मुद्रा छंद ।
प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥
Verse compositions, shloka compositions, various styles, gestures, and meters - all this should be learned; joy comes precisely from knowing what suits the occasion.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
One's memorized knowledge should be abundant and kept constantly refreshed; whatever has been taught should be remembered within.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
अखंड येकांत सेवावा । ग्रन्थमात्र धांडोळावा ।
प्रचित येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥
अखंड एकांताचे सेवन करावे, उपलब्ध सर्व ग्रंथ चाळून पाहावेत आणि ज्याची प्रचिती येईल तोच अर्थ मनात धरावा.
दासबोध : दशक अठरावा : समास तिसरा - निस्पृहशिकवणनिरूपण
अखंड येकांत सेवावा । ग्रन्थमात्र धांडोळावा ।
प्रचित येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥
One should constantly seek solitude, search through every available text, and hold in the mind only that meaning which is confirmed by direct experience.