आवर्णोदकीं हटकेश्वर । त्यास घडे नमस्कार ।
महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥
आवरणरूप उदकाच्या पलीकडे हाटकेश्वर आहे, त्याला नमस्कार घडतो. त्या पाताळलिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
आवर्णोदकीं हटकेश्वर । त्यास घडे नमस्कार ।
महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥
Beyond the encircling primal waters stands Hatakeshwar, to whom homage is offered. The glory of that subterranean linga is exceedingly great.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना ।
विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी ॥ २ ॥
परंतु तेथे प्रत्यक्ष जाता येत नाही, शरीराने त्याचे दर्शनही घडत नाही. त्या ईश्वराला विवेकानेच अनुमानाने जाणून घ्यावे लागते.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना ।
विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्वरासी ॥ २ ॥
But one cannot actually travel there, nor can the body ever gain a direct sight of it. That Lord must be grasped only through discernment and inference.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
सातां समुद्रांचे वेडे । उदंड भूमि पैलिकडे ।
सेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥
सात समुद्रांच्या पलीकडे प्रचंड भूमी पसरलेली आहे. आणि शेवटी भूमंडळाच्या सीमारेषाही तुटलेल्या आहेत.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
सातां समुद्रांचे वेडे । उदंड भूमि पैलिकडे ।
सेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥
Beyond the seven encircling oceans lies a vast expanse of land, and beyond that, at last, even the very edges of the earth-disc come to an end.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
सात समुद्र वोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे ।
म्हणोन विवेकी असावे । साधुजन ॥ ४ ॥
सात समुद्र ओलांडून तेथे जाणे कसे शक्य होणार? म्हणूनच साधुजनांनी विवेकी असावे.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
सात समुद्र वोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे ।
म्हणोन विवेकी असावे । साधुजन ॥ ४ ॥
How could one ever actually manage to cross seven oceans to get there? For this very reason, sadhus must rely on discernment instead.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जें आपणास नव्हे ठावें । तें जाणतयास पुसावें ।
मनोवेगें तनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥
जे आपल्याला माहीत नसते, ते जाणत्या माणसाला विचारावे. मनाच्या वेगाने शरीराने फिरता येणे शक्य नाही.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जें आपणास नव्हे ठावें । तें जाणतयास पुसावें ।
मनोवेगें तनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥
Whatever one does not know oneself should be asked of one who knows. The body cannot possibly travel at the speed of the mind.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञानदृष्टीनें पाहावें ।
ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥
जे चर्मचक्षूंना दिसत नाही, ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ब्रह्मांडाचा नीट विचार करून समाधानाने राहावे.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञानदृष्टीनें पाहावें ।
ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥
What the physical eye cannot see should be seen with the eye of knowledge. One should carefully examine the whole cosmos and thereby remain at peace.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
मध्यें आहे भूमीचें चडळ । म्हणौन आकाश आणि पाताळ ।
तें चडळ नस्तां अंतराळ । चहुंकडे ॥ ७ ॥
मध्ये भूमीचा गोळा असल्यामुळेच आकाश व पाताळ असे भेद दिसतात. तो गोळाच नसता तर चोहीकडे केवळ अंतराळच असते.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
मध्यें आहे भूमीचें चडळ । म्हणौन आकाश आणि पाताळ ।
तें चडळ नस्तां अंतराळ । चहुंकडे ॥ ७ ॥
It is only because the mass of the earth lies in between that the distinction of sky above and netherworld below appears. Were that mass not there, there would be nothing but open space on every side.
That alone should be called Parabrahma — which is by its very nature free of all attributes, and where even the name of visible Maya amounts to sheer void.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास ।
मनातीत निराभास । विवेकें जाणावें ॥ ९ ॥
डोळ्यांना जे दिसते ते दृश्य होय, मनाला जे दिसते तो केवळ भास होय. मनाच्याही पलीकडे असलेले निराभास तत्त्व विवेकाने जाणावे.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास ।
मनातीत निराभास । विवेकें जाणावें ॥ ९ ॥
What the eye perceives is the visible object; what the mind perceives is a mere appearance. That which lies beyond the mind, free of all appearance, should be understood through discernment.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
दृश्य भास अवघा विघडे । विवेक तेथें पवाडे ।
भूमंडळीं ज्ञाते थोडे । सूक्ष्मदृष्टीचे ॥ १० ॥
दृश्य व भास हे दोन्ही जेव्हा नाहीसे होतात, तेव्हाच विवेक तेथे पोचतो. या पृथ्वीवर सूक्ष्म दृष्टी असलेले ज्ञाते फार थोडे असतात.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
दृश्य भास अवघा विघडे । विवेक तेथें पवाडे ।
भूमंडळीं ज्ञाते थोडे । सूक्ष्मदृष्टीचे ॥ १० ॥
Only when both the visible object and its mere appearance dissolve away does discernment truly reach that far. On this earth, those who possess such subtle, discerning knowledge are very few.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
वाच्यांश वाचेनें बोलावा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा ।
निर्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनयोगें ॥ ११ ॥
वाच्यांश (शब्दार्थ) वाणीने बोलून दाखवावा, पण लक्ष्यांश (सूचितार्थ) न बोलताच जाणावा. गुणांच्या साहाय्यानेच निर्गुण तत्त्व अनुभवाला आणावे.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
वाच्यांश वाचेनें बोलावा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा ।
निर्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनयोगें ॥ ११ ॥
The literal meaning may be spoken aloud, but the intended, deeper meaning must be grasped without being spoken. It is only through the medium of attributes that the attribute-less can be brought into direct experience.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
नाना गुणास आहे नाश । निर्गुण तें अविनाश ।
ढोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥
नाना गुणांना नाश आहे, पण निर्गुण तत्त्व मात्र अविनाशी आहे. ढोबळाहून सूक्ष्माचे दर्शन अधिक विशेष असते.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
नाना गुणास आहे नाश । निर्गुण तें अविनाश ।
ढोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥
Every quality is subject to destruction, but the attribute-less alone is imperishable. Seeing the subtle is a far more special thing than seeing the gross.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें ।
श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥
जे डोळ्यांना दिसत नाही, ते श्रवणाने जाणून घ्यावे. श्रवण व मननाने सर्व काही उमगते.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें ।
श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥
What cannot be seen with the eyes should be understood by hearing about it. Through hearing and reflection, everything at last becomes known.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना ।
अवघें सगट पिटावेना । कोणियेकें ॥ १४ ॥
अष्टधाप्रकृतीचे नाना पदार्थ इतके अफाट आहेत की सगळे पाहूनही कळत नाहीत. कोणालाही सगळ्याचीच सरसकट परीक्षा करता येत नाही.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना ।
अवघें सगट पिटावेना । कोणियेकें ॥ १४ ॥
The eightfold Prakriti brings forth such countless varieties of things that, however much one examines, they cannot all be grasped. No one can indiscriminately test and sort through absolutely everything.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली ।
चविनटानें कालविलीं । नाना अन्नें ॥ १५ ॥
सगळे सरसकट एकसारखे मानले, तर तेथे परीक्षाच बुडून जाते. जणू चोचल्याने नाना अन्ने एकत्र कालवावीत तसा हा प्रकार होतो.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली ।
चविनटानें कालविलीं । नाना अन्नें ॥ १५ ॥
If everything is treated as indiscriminately the same, then all real discrimination is simply drowned. It becomes like some careless person mixing together every kind of food into one mess.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
टोणपा नव्हे गुणग्राहिक । मुर्खास कळेना विवेक ।
विवेक आणि अविवेक । येकचि म्हणती ॥ १६ ॥
टोणपा (मूर्ख) माणूस गुणग्राहक नसतो, त्याला विवेकच कळत नाही. विवेक आणि अविवेक हे दोन्ही तो एकच मानतो.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
टोणपा नव्हे गुणग्राहिक । मुर्खास कळेना विवेक ।
विवेक आणि अविवेक । येकचि म्हणती ॥ १६ ॥
The blockhead does not know how to appreciate real quality; discernment itself is beyond him. He takes discrimination and the lack of it to be one and the same thing.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभासचि बुडाला ।
नाना अभ्यासें प्राणियाला । सुटिका कैंची॥ १७ ॥
उंच-नीच कळत नाही अशा माणसाच्या ठायी सारा भासच बुडून गेलेला असतो. अशा प्राण्याला कितीही अभ्यास केला तरी त्यातून सुटका कशी मिळणार?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभासचि बुडाला ।
नाना अभ्यासें प्राणियाला । सुटिका कैंची॥ १७ ॥
One who cannot even tell high from low has, in effect, drowned all power of perception itself. However much such a person may study or practice, how could real release ever come to him?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
वेड लागोन जालें वोंगळ । त्यास सारिखेंच वाटे सकळ ।
तें जाणावें बाश्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥
वेड लागून ज्याची स्थिती अगदी घाणेरडी झाली आहे, त्याला सगळेच सारखे वाटते. असे लोक बडबडे असतात, ते खरे विवेकी नसतात.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
वेड लागोन जालें वोंगळ । त्यास सारिखेंच वाटे सकळ ।
तें जाणावें बाश्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥
One who has gone mad and fallen into a filthy state finds everything alike to him. Such people are merely babblers — they are not truly discerning at all.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश ।
बहुचकीच्या लोकांस । काये म्हणावें ॥ १९ ॥
जे अखंड नाश पावत असते, त्यालाच असे लोक अविनाशी म्हणतात. अशा भ्रमिष्ट लोकांना काय म्हणावे?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश ।
बहुचकीच्या लोकांस । काये म्हणावें ॥ १९ ॥
That which is constantly perishing — such people call it imperishable. What indeed is one to say of people so utterly deluded?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
ईश्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले ।
आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥
ईश्वराने नाना भेद निर्माण केले आहेत, त्या भेदांनीच ही सारी सृष्टी चालते. पण अंधळेच जर परीक्षक बनून बसले, तर तेथे खरी परीक्षा कोठून होणार?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
ईश्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले ।
आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥
God himself has established these countless distinctions, and by these very distinctions the whole creation functions. But when the blind set themselves up as judges, how can any real judgment take place there?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाव ।
गुणचि नाहीं गौरव । येईल कैंचें ॥ २१ ॥
जेथे परीक्षेचाच अभाव आहे, तो टोणप्यांचा समुदाय होय. जेथे गुणच नाहीत तेथे गौरव कोठून येणार?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाव ।
गुणचि नाहीं गौरव । येईल कैंचें ॥ २१ ॥
Where discernment itself is entirely absent, there one finds only a crowd of blockheads. Where there is no real virtue at all, from where could honor possibly come?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
खरें खोटें येकचि जालें । विवेकानें काय केलें ।
असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥
खरे आणि खोटे यांना एकच मानले, तर मग विवेकाने साधले तरी काय? साधुजनांनी मात्र असार सोडून सारच स्वीकारलेले असते.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
खरें खोटें येकचि जालें । विवेकानें काय केलें ।
असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥
If the true and the false are taken as one and the same, then what indeed has discernment accomplished? The truly wise, however, have always discarded the worthless and taken hold of the essential.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
उत्तम वस्तूचि परीक्षा । कैसी घडे नतद्रक्षा ।
दीक्षाहीनापासीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥
उत्तम वस्तूची खरी परीक्षा दुर्जनाला कशी घडणार? ज्याला दीक्षाच नाही, त्याच्याजवळ दीक्षा कोठून येणार?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
उत्तम वस्तूचि परीक्षा । कैसी घडे नतद्रक्षा ।
दीक्षाहीनापासीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥
How could a wicked, worthless person ever properly judge something truly excellent? From one who has received no real initiation, how could initiation ever come?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
आपलेन वोंगळपणें । दिशाकरून शौच्य नेणे ।
वेद शास्त्रें पुराणें । त्यास काये करिती ॥ २४ ॥
जो स्वतःच्या घाणेरडेपणामुळे शौचाची साधी शुद्धताही जाणत नाही, त्याला वेद, शास्त्रे, पुराणे तरी काय करणार?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
आपलेन वोंगळपणें । दिशाकरून शौच्य नेणे ।
वेद शास्त्रें पुराणें । त्यास काये करिती ॥ २४ ॥
One who, out of his own filthy habits, does not even know basic cleanliness after relieving himself — what good can the Vedas, scriptures, or Puranas do for such a person?
First one must keep to right conduct, and only then take up discernment. It is through conduct and discernment together that the far shore is finally reached.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जे नेमकास न कळे । तें बश्कळास केवी कळे ।
डोळस ठकती आंधळे । कोण्या कामाचे ॥ २६ ॥
जे नेमक्या, चोख माणसालाही कळत नाही, ते बडबड्या मूर्खाला कसे कळणार? डोळस माणसेच जेथे फसतात, तेथे आंधळे कशाच्या उपयोगाचे?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
जे नेमकास न कळे । तें बश्कळास केवी कळे ।
डोळस ठकती आंधळे । कोण्या कामाचे ॥ २६ ॥
What even a precise, discerning person struggles to grasp — how could a babbling fool ever understand it? Where even the sighted are deceived, what use could the blind possibly be?
If sin and merit, heaven and hell, are all taken to be one and the same, then what, indeed, is to be made of discrimination and its absence?
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती ।
कुकर्में होते फजिती । सत्कर्में कीर्ति वाढे ॥ २८ ॥
अमृत व विष एकच आहे असे म्हणतात खरे, पण विष घेतले असता प्राण जातातच. कुकर्मांनी फजिती होते, तर सत्कर्मांनी कीर्ती वाढते.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती ।
कुकर्में होते फजिती । सत्कर्में कीर्ति वाढे ॥ २८ ॥
They may say that nectar and poison are one and the same, but taking poison still costs one's life. Evil deeds bring disgrace, while good deeds make one's fame grow.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्प विवेक ।
तेथें अवघेच निरार्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥
इहलोक व परलोक या दोन्हींबाबत जेथे निश्चित विवेकच नाही, तेथे सर्व काही निरर्थकच ठरते.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्प विवेक ।
तेथें अवघेच निरार्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥
Where there is no firm, deliberate discernment regarding both this world and the next, there everything whatsoever turns out utterly meaningless.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
म्हणौन संतसंगेंचि जावें । सत्शास्त्रचि श्रवण करावें ।
उत्तम गुणास अभासावें । नाना प्रयेत्नें ॥ ३० ॥
म्हणून संतांच्याच संगतीने जावे, सत्शास्त्रांचेच श्रवण करावे. नाना प्रयत्नांनी उत्तम गुणांचा अंगीकार करावा.
दासबोध : दशक सतरावा : समास दहावा - टोणपसिद्धलक्षण
म्हणौन संतसंगेंचि जावें । सत्शास्त्रचि श्रवण करावें ।
उत्तम गुणास अभासावें । नाना प्रयेत्नें ॥ ३० ॥
Therefore one should walk only in the company of the saintly, and listen only to true scriptures. Through every possible effort, one should strive to embrace the finest, most excellent qualities.