पृथ्वीमधें लोक नाना । त्यास नाना उपासना । भावार्थें प्रवर्तले भजना । ठाईं ठाईं ॥ १ ॥
पृथ्वीवर नाना प्रकारचे लोक आहेत, त्यांना नाना उपासना आहेत; ते सर्व श्रद्धेने जागोजागी भजनाला प्रवृत्त झालेले आहेत.
पृथ्वीमधें लोक नाना । त्यास नाना उपासना । भावार्थें प्रवर्तले भजना । ठाईं ठाईं ॥ १ ॥
On this earth there are countless kinds of people, and they follow countless modes of worship; each, with heartfelt faith, has taken up devotion in his own way and place.
अपुल्या देवास भजती । नाना स्तुती स्तवनें करिती । जे जे निर्गुण म्हणिती । उपासनेसी ॥ २ ॥
प्रत्येकजण आपापल्या देवाला भजतो, नाना स्तुती-स्तवने करतो; आणि आपापल्या उपासनेला 'निर्गुण' असे म्हणतो.
अपुल्या देवास भजती । नाना स्तुती स्तवनें करिती । जे जे निर्गुण म्हणिती । उपासनेसी ॥ २ ॥
Each person worships his own chosen deity, offering countless praises and hymns; and each calls his own form of worship "the formless, attributeless one."
याचा कैसा आहे भाव । मज सांगिजे अभिप्राव । अरे हा स्तुतीचा स्वभाव । ऐसा आहे ॥ ३ ॥
(श्रोता विचारतो) याचा खरा भावार्थ काय आहे, तो मला सांगावा. (वक्ता म्हणतो) अरे, स्तुतीचा स्वभावच असा असतो.
याचा कैसा आहे भाव । मज सांगिजे अभिप्राव । अरे हा स्तुतीचा स्वभाव । ऐसा आहे ॥ ३ ॥
(The listener asks) What is the true meaning behind this? Please explain it to me. (The speaker replies) Well, this is simply the nature of praise itself.
निर्गुण म्हणिजे बहुगुण । बहुगुणी अंतरात्मा जाण । सकळ त्याचे अंश हें प्रमाण । प्रचित पाहा ॥ ४ ॥
निर्गुण म्हणजे अनेक गुणांनी युक्त असा अर्थ आहे; बहुगुणी अंतरात्माच तो जाणावा; सर्व देवता त्याचेच अंश आहेत, हे प्रत्यक्ष अनुभवाने पाहा.
निर्गुण म्हणिजे बहुगुण । बहुगुणी अंतरात्मा जाण । सकळ त्याचे अंश हें प्रमाण । प्रचित पाहा ॥ ४ ॥
"Nirguna" (attributeless) actually means one possessed of countless attributes; know that this is the many-gifted Antaratma itself; all deities are but his portions - verify this through your own direct experience.
सकळ जनासी मानावें तें । येका अंतरात्म्यास पावतें । अधिकारपरत्वें तें । मान्य कीजे ॥ ५ ॥
सर्व लोक जे जे मानतात-पूजतात, ते सर्व एकाच अंतरात्म्याला जाऊन पोहोचते; ते ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार मान्य करावे.
सकळ जनासी मानावें तें । येका अंतरात्म्यास पावतें । अधिकारपरत्वें तें । मान्य कीजे ॥ ५ ॥
Whatever all people honor and worship ultimately reaches that one same inner Self; each form of worship should be accepted according to the worshiper's own spiritual capacity.
श्रोता म्हणे हा अनुमान । मुळीं घालावें जीवन । तें पावे पानोपान । हे सध्या प्रचिती ॥ ६ ॥
श्रोता म्हणतो, हे केवळ अनुमान झाले; झाडाच्या मुळाशी पाणी घातले की ते पानोपानी पोहोचते, हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे.
श्रोता म्हणे हा अनुमान । मुळीं घालावें जीवन । तें पावे पानोपान । हे सध्या प्रचिती ॥ ६ ॥
The listener says: this is merely a supposition; but when water is poured at the root of a tree, it visibly reaches every single leaf - that is direct, present experience.
वक्ता म्हणे तुळसीवरी । उदक घालावें पात्रभरी । परी न थिरे निमिषभरी । भूमीस भेदे ॥ ७ ॥
वक्ता म्हणतो, तुळशीवर पात्रभर पाणी घातले तरी ते तेथे क्षणभरही थांबत नाही, लगेच भूमीत मुरून जाते.
वक्ता म्हणे तुळसीवरी । उदक घालावें पात्रभरी । परी न थिरे निमिषभरी । भूमीस भेदे ॥ ७ ॥
The speaker replies: even if you pour a whole vessel of water over a tulsi plant, it does not stay there even for an instant - it sinks straight into the ground.
थोरा वृक्षास कैसें करावें । सेंड्या पात्र कैसें न्यावें । याचा अभिप्राव देवें । मज निरोपावा ॥ ८ ॥
मोठ्या वृक्षाच्या बाबतीत काय करावे? त्याच्या शेंड्यापर्यंत पात्र कसे न्यावे? याचा खरा अभिप्राय देवाने मला सांगावा.
थोरा वृक्षास कैसें करावें । सेंड्या पात्र कैसें न्यावें । याचा अभिप्राव देवें । मज निरोपावा ॥ ८ ॥
But what is to be done for a great, tall tree? How can one carry a vessel of water up to its very top? Let the Lord explain to me the true meaning of this.
प्रजन्याचें उदक पडतें । तें तों मुळाकडे येतें । हात चि पावेना तेथें । काये करिती ॥ ९ ॥
पावसाचे पाणी वरून पडते, तेच शेवटी झाडाच्या मुळाकडे येऊन पोहोचते; तेथे तर आपला हातही पोहोचत नाही, मग काय करावे?
प्रजन्याचें उदक पडतें । तें तों मुळाकडे येतें । हात चि पावेना तेथें । काये करिती ॥ ९ ॥
Rainwater falls from above, and that same water eventually reaches down to the roots below; there, our own hand cannot even reach - so what is one to do?
सकळास मूळ सांपडे । ऐसें पुण्य कैचें घडे । साधुजनाचें पवाडे । विवेकीं मन ॥ १० ॥
सर्वांनाच मूळ सापडावे, इतके पुण्य कोठून लाभणार? साधुजनांचे मोठेपण हे विवेकी मनालाच कळते.
सकळास मूळ सांपडे । ऐसें पुण्य कैचें घडे । साधुजनाचें पवाडे । विवेकीं मन ॥ १० ॥
Where does such great merit come from, that everyone should find the very root? The true greatness of saintly people is understood only by a discerning mind.
तथापी वृक्षांचेनि पडिपाडें । जीवन घालितां कोठें पडे । ये गोष्टीचें सांकडें । कांहींच नाहीं ॥ ११ ॥
तथापि झाडाच्या रचनेप्रमाणे पाणी कोठेही घातले तरी ते शेवटी झाडालाच पोहोचते; यात काहीच अडचण नाही.
तथापी वृक्षांचेनि पडिपाडें । जीवन घालितां कोठें पडे । ये गोष्टीचें सांकडें । कांहींच नाहीं ॥ ११ ॥
Nevertheless, given the very structure of a tree, wherever the water is poured, it ultimately reaches the tree itself; there is truly no difficulty in this matter at all.
मागील आशंकेचें निर्शन । होतां जालें समाधान । आतां गुणास निर्गुण । कैसें म्हणती ॥ १२ ॥
अशाप्रकारे मागील शंकेचे निरसन होताच समाधान झाले; आता गुणाला निर्गुण असे का म्हणतात, ते पाहू.
मागील आशंकेचें निर्शन । होतां जालें समाधान । आतां गुणास निर्गुण । कैसें म्हणती ॥ १२ ॥
With the previous doubt thus resolved, satisfaction was reached; now let us see why what has qualities (guna) is nonetheless called nirguna, without qualities.
चंचळपणें विकारलें । सगुण ऐसें बोलिलें । येर तें निर्गुण उरलें । गुणातीत ॥ १३ ॥
जे चंचळ होऊन विकाररूपाला आले, त्याला सगुण असे म्हणतात; आणि जे तसे न होता शिल्लक उरते, ते गुणातीत निर्गुण होय.
चंचळपणें विकारलें । सगुण ऐसें बोलिलें । येर तें निर्गुण उरलें । गुणातीत ॥ १३ ॥
That which becomes restless and takes on modification is called "saguna," as possessing attributes; and that which remains untouched by such change is what is called "nirguna," beyond all qualities.
वक्ता म्हणे हा विचार । शोधून पाहावें सारासार । अंतरीं राहातां निर्धार । नांव नाहीं ॥ १४ ॥
वक्ता म्हणतो, हा विचार सारासार शोधून पाहावा; अंतःकरणात निश्चितपणे स्थिर झाल्यावर त्याला कोणतेही नाव उरत नाही.
वक्ता म्हणे हा विचार । शोधून पाहावें सारासार । अंतरीं राहातां निर्धार । नांव नाहीं ॥ १४ ॥
The speaker says: examine this matter carefully, weighing what is essential against what is not; once it settles firmly within the heart, no name remains applicable to it at all.
विवेकेंचि तो मुख्य राजा । आणि सेवकाचें नांव राजा । याचा विचार समजा । वेवाद खोटा ॥ १५ ॥
विवेकानेच खरा मुख्य राजा कोण ते कळते, अन्यथा सेवकालाही 'राजा' असे नाव दिले जाऊ शकते; हा विचार नीट समजून घ्या, उगाच वाद घालणे व्यर्थ आहे.
विवेकेंचि तो मुख्य राजा । आणि सेवकाचें नांव राजा । याचा विचार समजा । वेवाद खोटा ॥ १५ ॥
Only through discernment does one know who the true, principal king really is; otherwise even a servant might be given the title "king." Understand this reasoning well - idle argument over it is pointless.
कल्पांतप्रळईं जें उरलें । तें निर्गुण ऐसें बोलिलें । येर तें अवघेंचि जालें । मायेमधें ॥ १६ ॥
महाप्रळयाच्या वेळीही जे शिल्लक उरते, त्यालाच निर्गुण असे म्हणतात; बाकी सर्व काही मायेच्या कक्षेतच सामावलेले आहे.
कल्पांतप्रळईं जें उरलें । तें निर्गुण ऐसें बोलिलें । येर तें अवघेंचि जालें । मायेमधें ॥ १६ ॥
That which remains even at the time of the great cosmic dissolution - that alone is called nirguna; everything else falls entirely within the realm of Maya.
सेना शाहार बाजार । नाना यात्रा लाहानथोर । शब्द उठती अपार । कैसे निवडावे ॥ १७ ॥
सैन्याची छावणी, शहर, बाजार, नाना लहानमोठ्या यात्रा - या सर्व ठिकाणी अपार शब्द (आवाज) उठतात; त्यांतील नेमके काय ते कसे निवडावे?
सेना शाहार बाजार । नाना यात्रा लाहानथोर । शब्द उठती अपार । कैसे निवडावे ॥ १७ ॥
A military camp, a city, a marketplace, countless great and small pilgrimages - in all these places countless sounds arise; how is one to sort out and identify each one precisely?
काळामधें प्रज्यन्यकाळ । मध्यरात्रीं होतां निवळ । नाना जीव बोलती सकळ । कैसे निवडावे ॥ १८ ॥
पावसाळ्याच्या काळात, मध्यरात्री सर्व शांत झाले असता, नाना जीव आवाज करू लागतात; त्यातील प्रत्येकाचा आवाज कसा निवडून काढावा?
काळामधें प्रज्यन्यकाळ । मध्यरात्रीं होतां निवळ । नाना जीव बोलती सकळ । कैसे निवडावे ॥ १८ ॥
During the rainy season, when midnight brings a lull, countless creatures all begin to call out at once; how is one to distinguish each separate sound?
नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । बहु ऋषी बहु मतें । कैसीं निवडावीं ॥ १९ ॥
भूमंडळावर नाना देश, नाना भाषा, नाना मते असंख्य आहेत; अनेक ऋषींची अनेक मतेही आहेत; त्यांतील कोणते खरे ते कसे निवडावे?
नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें । बहु ऋषी बहु मतें । कैसीं निवडावीं ॥ १९ ॥
On this earth there are countless lands, languages and doctrines beyond number; many sages hold many differing views - how is one to determine which among them is true?
वृष्टी होतां च अंकुर । सृष्टीवरी निघती अपार । नाना तरु लाहानथोर । कैसे निवडावे ॥ २० ॥
पाऊस पडताच सृष्टीवर अगणित अंकुर फुटतात, नाना लहानमोठे वृक्ष उगवतात; त्यातील प्रत्येकाचे स्वरूप कसे निवडून सांगावे?
वृष्टी होतां च अंकुर । सृष्टीवरी निघती अपार । नाना तरु लाहानथोर । कैसे निवडावे ॥ २० ॥
The moment rain falls, countless sprouts spring up across the earth, and every kind of tree, great and small, grows forth; how is one to distinguish and describe each one individually?
खेचरें भूचरें जळचरें । नाना प्रकारींचीं शरीरें । नान रंग चित्रविचित्रें । कैसी निवडावीं ॥ २१ ॥
आकाशचर, भूचर, जलचर - नाना प्रकारची शरीरे, नाना विचित्र रंग - त्यांतील प्रत्येक कसे निवडून वेगळे दाखवावे?
खेचरें भूचरें जळचरें । नाना प्रकारींचीं शरीरें । नान रंग चित्रविचित्रें । कैसी निवडावीं ॥ २१ ॥
Creatures of the sky, of the land, and of the water - bodies of every conceivable kind, colors of every strange and wondrous hue - how could one possibly pick out and distinguish each one?
कैसें दृश्य आकारलें । नानापरीं विकारलें । उदंडचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥
हे दृश्य जग कसे आकाराला आले, नाना प्रकारे कसे विकाराला आले, आणि इतके अफाट कसे पसरले - हे सर्व कसे निवडून सांगावे?
कैसें दृश्य आकारलें । नानापरीं विकारलें । उदंडचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥
How did this visible world come to take form, how did it undergo such countless transformations, and how did it spread out to such immense proportions - how could one possibly sort all this out?
पोकळीमधें गंधर्वनगरें । नाना रंग लाहनथोरें । बहु वेक्ति बहु प्रकारें । कैसीं निवडावीं ॥ २३ ॥
आकाशातील पोकळीत गंधर्वनगरांसारखी भासमान दृश्ये उमटतात, नाना रंगांची लहानमोठी बहुविध रूपे प्रगटतात - ती कशी निवडून दाखवावी?
पोकळीमधें गंधर्वनगरें । नाना रंग लाहनथोरें । बहु वेक्ति बहु प्रकारें । कैसीं निवडावीं ॥ २३ ॥
In the empty sky, mirage-like phantom cities of the Gandharvas appear, with countless colors, great and small, in myriad forms - how could one possibly distinguish them all?
दिवसरजनीचे प्रकार । चांदिणें आणी अंधकार । विचार आणी अविचार । कैसा निवडावा ॥ २४ ॥
दिवस-रात्रीचे प्रकार, चांदणे आणि अंधकार, विचार आणि अविचार - हे सर्व नेमके कसे निवडून वेगळे करावे?
दिवसरजनीचे प्रकार । चांदिणें आणी अंधकार । विचार आणी अविचार । कैसा निवडावा ॥ २४ ॥
The alternation of day and night, moonlight and darkness, sound reasoning and rash folly - how is one to properly sort out and distinguish all of these?
विसर आणी आठवण । नेमस्त आणी बाष्कळपण । प्रचित आणी अनुमान । येणें रितीं ॥ २५ ॥
विसर आणि आठवण, नेमस्तपणा आणि बडबडपणा, प्रत्यक्ष अनुभव आणि केवळ अनुमान - हे सर्व अशाच पद्धतीने निवडून पाहावे लागते.
विसर आणी आठवण । नेमस्त आणी बाष्कळपण । प्रचित आणी अनुमान । येणें रितीं ॥ २५ ॥
Forgetting and remembering, discipline and idle chatter, direct experience and mere inference - all of these too must be sorted out and distinguished in just this same way.
न्याय आणी अन्याय । होय आणी न होये । विवेकेंविण काये । उमजों जाणे ॥ २६ ॥
न्याय आणि अन्याय, जे होते आणि जे होत नाही - विवेकाशिवाय हे कोणाला उमजून येणार?
न्याय आणी अन्याय । होय आणी न होये । विवेकेंविण काये । उमजों जाणे ॥ २६ ॥
Justice and injustice, what comes to pass and what does not - without discernment, who could possibly understand any of this?
कार्यकर्ता आणी निकामी । शूर आणी कुकर्मी । धर्मी आणी अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥
कार्यक्षम आणि निकामी, शूर आणि दुष्कर्मी, धार्मिक आणि अधार्मिक - हे सर्व स्पष्टपणे ओळखता आले पाहिजे.
कार्यकर्ता आणी निकामी । शूर आणी कुकर्मी । धर्मी आणी अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥
The capable and the useless, the brave and the wicked, the righteous and the unrighteous - all of these must be clearly recognized.
धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तश्कर । खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥
धनवान आणि दिवाळखोर, प्रामाणिक आणि चोर, खरे आणि खोटे - हा भेद स्पष्टपणे कळला पाहिजे.
धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तश्कर । खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥
The wealthy and the bankrupt, the honest and the thief, the true and the false - this distinction must be clearly understood.
वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट आणी अंतरनिष्ठ । सारासार विचार पष्ट । कळला पाहिजे ॥ २९ ॥
श्रेष्ठ आणि कनिष्ठ, भ्रष्ट आणि अंतरनिष्ठ (खरा भक्त) - हा सारासार विचार स्पष्टपणे कळला पाहिजे.
वरिष्ठ आणि कनिष्ठ । भ्रष्ट आणी अंतरनिष्ठ । सारासार विचार पष्ट । कळला पाहिजे ॥ २९ ॥
The superior and the inferior, the corrupt and the truly devout at heart - this discernment between the essential and the non-essential must be clearly grasped.