स्फटिकमाळा मोहरेमाळा । काष्ठमाळा गंधमाळा ।
धातुमाळा रत्नेमाळा । जाळ्या वोलि चांदोवे ॥ २ ॥
स्फटिकांच्या माळा, नाण्यांच्या माळा, लाकडाच्या माळा, सुगंधी द्रव्यांच्या माळा, धातूंच्या माळा, रत्नांच्या माळा, जाळ्या, चांदवे — हे सगळेही असेच सूत्राने गुंफलेले असतात.