आकाशासम व्यापक ईश्वर
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा । नभाचे परी व्यापकु जाण तैसा । सदा संचला येत ना जात कांहीं । तयावीण कोठें रिता ठाव नाहीं ॥
या प्रश्नाला श्रीसमर्थ असे उत्तर देतात की, हृदयामध्ये जो देव राहतो, तो नभाप्रमाणे सर्वत्र व्यापून असतो, असे समजावे. तो निरंतर सर्वत्र भरलेला आहे. तो येत नाही किंवा जातही नाही. तो सर्वत्र व्यापलेला असल्याने त्याच्याशिवाय मोकळी अशी जागाच नाही.
pocketpage.in
God as All-Pervading as the Sky
वसे हृदयीं देव तो जाण ऐसा । नभाचे परी व्यापकु जाण तैसा । सदा संचला येत ना जात कांहीं । तयावीण कोठें रिता ठाव नाहीं ॥
Shri Samartha answers this by saying that the God who dwells in the heart should be understood as pervading everywhere just like the sky. He remains ever full everywhere, neither coming nor going. Because he pervades all things, there is no place empty of him.
pocketpage.in