अगम्य परब्रह्मस्वरूप
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें । दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें । तया खूण ते हीण दृष्टान्त पाहे । तेथें संग निःसंग दोनी न साहे ॥
ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही, अशा भगवंताचे स्वरूप मनाला कधी आकलन करता येत नाही. तो सर्वोत्तम आहे. त्याचे ध्यान अभिन्नपणे करावे. खुणेने त्याचे स्वरूप सांगायचा प्रयत्न करावा, तर दृष्टांत अपुरा पडतो. तो एकमेवाद्वितीय आहे. तेथे संग व निःसंग या गोष्टी उरत नाहीत.
The Ungraspable Supreme Form
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें । दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें । तया खूण ते हीण दृष्टान्त पाहे । तेथें संग निःसंग दोनी न साहे ॥
The mind can never grasp or shake the form of the One who never changes; He is the highest of all, and one should meditate on Him as inseparable from oneself. Any attempt to point to His form through examples falls short, for He is one without a second, and there the very notions of attachment and detachment no longer apply.