अजामिळाची नामाने मुक्ती
अजामेळ पापी वदे पुत्रकामें। तया मुक्ति नारायणाचेनि नामें। शुकाकारणें कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥
अजामिळ नावाच्या महापातक्याने अंतकाळी आपल्या नारायण नावाच्या मुलाला व्याकूळ होऊन हाक मारली. मुलाच्या निमित्ताने देवाचे नाम मुखात आले, त्यामुळे त्याला मुक्ती मिळाली. एक गणिका आपल्या पोपटाला राम-नाम शिकवायची, त्यामुळे तिचा उद्धार झाला आणि त्यामुळे पुराणांनी तिची कीर्ती गायली आहे.
Even the Sinner Was Freed by the Name
अजामेळ पापी वदे पुत्रकामें। तया मुक्ति नारायणाचेनि नामें। शुकाकारणें कुंटणी राम वाणी। मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं॥
The great sinner Ajamil, at the hour of his death, cried out in distress to his son named Narayan. Because of the son's name, God's own name came upon his lips, and through it he attained liberation. Likewise, a courtesan used to teach her parrot to say Rama's name; because of this she too was redeemed, and the Puranas have sung of her fame.