अंतकाळी सोडवी राम
विठोनें शिरीं वाहिला देवराणा। तया अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा। निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी। जिवां सोडवी राम हा अंतकाळीं॥
पांडुरंगाने महादेवाला डोक्यावर धारण केले आहे. त्या महादेवाला प्रभू रामाचा ध्यास लागलेला आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? राम-नामामुळे महादेवाचा दाह दूर झाला. तो रामच जीवांना अंतकाळी सोडविणारा आहे, म्हणून त्याचा नाम-जप करा.
pocketpage.in
Rama Saves at the Final Hour
विठोनें शिरीं वाहिला देवराणा। तया अंतरीं ध्यास रे त्यासि नेणा। निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी। जिवां सोडवी राम हा अंतकाळीं॥
Panduranga carries Mahadev upon his own head. Did you not know that this very Mahadev is absorbed in longing for Lord Rama? It was Rama's name that removed Mahadev's burning agony. It is Rama alone who liberates souls at the hour of death, so chant his name.
pocketpage.in