भक्तरक्षणाचे ब्रीद
पदीं राघवाचें सदा ब्रीद गाजे । बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे । पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
प्रभू रामाच्या पायातील तोडर हे जाहीर करतो की, भक्तांचे रक्षण करणे हे प्रभू रामाचे ब्रीद आहे. जे भक्तांचे शत्रू असतात त्यांच्या डोक्यावर राम आपल्या धनुष्य-दंडाचा प्रहार करून त्यांचा नायनाट करतो. ज्याने आपली सारी नगरी विमानातून वैकुंठाला नेली, तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
Rama's Vow to Protect His Devotees
पदीं राघवाचें सदा ब्रीद गाजे । बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे । पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
The anklet on Lord Rama's feet proclaims that protecting his devotees is his very vow. He strikes down the enemies of his devotees with the force of his bow. He is the one who carried his entire city to heaven by celestial chariot; such a Rama, who takes pride in his devotees, never neglects them.