भटकण्यात सुख नाही
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। सिणावें परी नातुडे हीत कांहीं। विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥
हे मना, सैरावैरा भटकण्याने कधीही सुख मिळणार नाही. प्रपंचाचे मागे लागून भटकण्यात व्यर्थ दमशील, कल्याण काही होणार नाही. विचार कर. आपली आपणच समजूत करून घे आणि तू प्रभू रामाच्याजवळ कायमचा राहा.
pocketpage.in
No Joy in Wandering
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं। सिणावें परी नातुडे हीत कांहीं। विचारें बरें अंतरा बोधवीजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥
O mind, wandering aimlessly will never bring happiness. Chasing after worldly life will only exhaust you fruitlessly, without any true good coming of it. Reflect, counsel yourself, and remain always near Lord Rama.
pocketpage.in