चिंतामणी असता काचेचे तुकडे
घरीं कामधेनू पुढें ताक मागे। हरीबोध सांडूनि वेवाद लागे। करी सार चिंतामणी काचखंडें। तया मागतां देत आहे उदंडें॥
ज्या मनुष्याच्या घरात कामधेनू आहे, त्याने दुसऱ्याकडे ताक मागू लागला, तर ते किती हास्यास्पद आहे. तसेच स्वत:जवळ अंतर्यामी परमात्मा असताना त्याचे ज्ञान मिळवायचे सोडून फुकट वादविवाद करीत राहणे, हे हास्यास्पद आहे. आपल्या हाती चिंतामणी असताना त्याच्याकडे उत्कृष्ट काही न मागता काचेचे तुकडे मागितले तर ते उदंड मिळतील, पण त्यांचा उपयोग काय?
Begging for Glass While Holding a Gem
घरीं कामधेनू पुढें ताक मागे। हरीबोध सांडूनि वेवाद लागे। करी सार चिंतामणी काचखंडें। तया मागतां देत आहे उदंडें॥
How absurd it would be for a man who has the wish-fulfilling cow at home to go begging his neighbor for buttermilk. Just as absurd is a person who, having God dwelling within, abandons the pursuit of that knowledge to argue pointlessly instead. If one holding the wish-fulfilling gem asks only for shards of glass, he may get plenty of them, but of what use are they?