देहभान सोडून भक्तिमार्गे जावे
देहेभान हे ज्ञानशस्त्रें खुडावें। विदेहीपणें भक्तिमागें चि जावें। विरक्तीबळें निंद्य सर्वे तजावें। परी संग सोडूनि सूखे रहावें॥
आत्मज्ञान करून घेऊन त्या शस्त्राने मी म्हणजे देह आहे ही जाणीव तोडून टाकावी. देहभान सोडून द्यावे आणि भक्तिमार्गाने जावे. अंगी विरक्ती बाणवून तिच्याद्वारे निंद्य असलेली देहबुद्धी, वासना इत्यादींचा त्याग करावा. विषयांचा संग सोडून द्यावा. म्हणजे स्वानंदाचे सुख प्राप्त होते.
Cut Away Body-Consciousness, Walk the Path of Devotion
देहेभान हे ज्ञानशस्त्रें खुडावें। विदेहीपणें भक्तिमागें चि जावें। विरक्तीबळें निंद्य सर्वे तजावें। परी संग सोडूनि सूखे रहावें॥
Attain Self-knowledge and use it as a sword to cut away the notion that I am the body. Give up body-consciousness and follow the path of devotion. Through the strength of dispassion, renounce all that is reprehensible, the body-sense, desires, and the like. Give up attachment to sense-objects, for that is how the bliss of the Self is attained.