देव भक्तांचा कैवारी
बहु श्रापितां कष्टला अंबऋषी। तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी। दिल्हा क्षीरसिंधू तया उपमानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
अंबरीष राजाला दुर्वास ऋषींच्या शापामुळे फार त्रास सोसावा लागला. त्याचे भगवंताने जन्म घेतले. भगवंताने, उपमन्यूला दूध पाहिजे होते म्हणून आपला क्षीरसागर त्याला बक्षीस देऊन टाकला. अर्थात भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही.
The Lord Protects His Devotees
बहु श्रापितां कष्टला अंबऋषी। तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी। दिल्हा क्षीरसिंधू तया उपमानी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
King Ambarish suffered greatly under the curse of sage Durvasa, and the Lord himself took on that hardship for his sake. Because sage Upamanyu wanted milk, the Lord gave away his own ocean of milk as a gift. Truly, the Lord is the protector of his devotees and never neglects them.