देवांचा रक्षणकर्ता राम
महा संकटीं सोडिले देव जेणें । प्रतापें बळें आगळा सर्वगुणें । जयातें स्मरे शैल्यजा शूळपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
प्रभू राम हा प्रतापशाली, बलवान आणि सर्वगुणसंपन्न असा आहे. रावणाने सर्व देवांना बंदी केले होते, तेव्हा रामानेच त्यांना त्या महासंकटातून सोडविले. शिव आणि पार्वती त्याचेच स्मरण करतात. तो भक्तांचा अभिमान बाळगणारा राम भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
Rama, Savior of the Gods
महा संकटीं सोडिले देव जेणें । प्रतापें बळें आगळा सर्वगुणें । जयातें स्मरे शैल्यजा शूळपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
Lord Rama is glorious, powerful, and endowed with every virtue. When Ravana had imprisoned all the gods, it was Rama who freed them from that great calamity. Shiva and Parvati themselves remember him. That Rama, who takes pride in his devotees, never neglects them.