दीनानाथाचे ब्रीद
बहूतांपरी हेंचि आतां धरावें। रघूनायेका आपुलेंसें करावें। दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥
हे मना, तुला पुष्कळ प्रकारे सांगून झाले. आता एकच लक्षात ठेव. प्रभू रामाला वश करून घे. दीनानाथ हे त्याचे ब्रीद सर्वत्र प्रसिद्ध आहे. तेव्हा त्याच्याजवळ तू कायमचा राहा.
pocketpage.in
Protector of the Humble
बहूतांपरी हेंचि आतां धरावें। रघूनायेका आपुलेंसें करावें। दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे। मना सज्जना राघवीं वस्ति कीजे॥
O mind, you have been told in many ways already; now remember just this one thing, win over Lord Rama's heart. He is famed everywhere as the protector of the humble, so remain forever close to him.
pocketpage.in