एकनिष्ठ कर्म, दया-भक्ती
बरी स्नानसंध्या करी येकनिष्ठा। विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा। दया सर्व भूतीं जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावें निवाला॥
मनुष्याने स्नानसंध्या इत्यादी शास्त्रविहित कर्में एकनिष्ठेने करावीत. एकाग्र न होणाऱ्या, नको तिथे जाणाऱ्या मनास विवेकाने आवर घालावा. ज्या मनुष्यास प्राणिमात्राबद्दल दया असते आणि ज्याला परमेश्वराबद्दल भक्तिभाव असतो, त्यालाच समाधान मिळते.
Single-Minded Duty, Compassion and Devotion
बरी स्नानसंध्या करी येकनिष्ठा। विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा। दया सर्व भूतीं जया मानवाला। सदा प्रेमळू भक्तिभावें निवाला॥
One should perform prescribed daily rites such as bathing and prayer with single-minded devotion. The mind, which refuses to settle and wanders where it should not, must be reined in through discernment. Only one who feels compassion for all beings and devotion toward God attains true contentment.