गणेश शारदा वंदन
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ अनंत या राघवाचा ॥
जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्त्व-रज-तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणाचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा, पश्यंती, मध्यमा वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो.
Invocation to Ganesha and Saraswati
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमूं पंथ अनंत या राघवाचा ॥
I bow to Ganesha, lord of the senses and the foundation of the three qualities of sattva, raja, and tama, who is also the origin of the attributeless Absolute. I also bow to goddess Sharada, source of the four forms of speech — para, pashyanti, madhyama, and vaikhari — and now set forth the path to the infinite, formless Lord.