गुरुकृपेने सुलभ गूढ तत्त्व
अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे । तेथें तर्क संपर्क तोंहीं न साहे । अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें । दुजेवीण जें खूण स्वामीप्रतापें ॥
परमात्म-स्वरूप हे अत्यंत पुरातन व इतके विशाल आहे की तेथे तर्क पोहोचूच शकत नाही. ते अत्यंत गूढ, गुप्त व स्थिर आहे. त्याच्या ठिकाणी द्वैत नाही. ही खूण सद्गुरुच्या कृपेने समजली की, ते तत्काळ सोपे व सुलभ बनते.
The Guru's Grace Makes the Hidden Easy
अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे । तेथें तर्क संपर्क तोंहीं न साहे । अती गूढ तें दृढ तत्काळ सोपें । दुजेवीण जें खूण स्वामीप्रतापें ॥
That Supreme Reality is so ancient and so vast that mere logic can never reach it. It is deeply hidden, secret, and unchanging, and within it there is no duality at all. Yet once this secret is understood through the grace of the true guru, it at once becomes simple and easily accessible.