कारणातीत परमेश्वर
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता । परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता । तया निर्विकल्पासि कल्पीत जावें । परी संग सोडूनि सूखें राहवें ॥
परमात्मा हा कार्य-कारण-भावाच्या पलीकडचा आहे. तो सृष्टीचे पालन करतो, असे आपण म्हणतो, परंतु तशा कल्पनेहून तो वेगळा आहे. तो परावाणीच्याही पलीकडचा आहे. त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. तो मायेने लिंपित होत नाही. तो सर्व कल्पनांच्या पलीकडचा आहे, तरीही प्रेमाने त्याच्या स्वरूपाची कल्पना करावी. विषयांचा संग सोडून द्यावा, आणि त्या परमात्म्याच्या सुखात मग्न राहावे.
The Uncaused One Beyond Words
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता । परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता । तया निर्विकल्पासि कल्पीत जावें । परी संग सोडूनि सूखें राहवें ॥
The Supreme is beyond the whole scheme of cause and effect. We say He sustains creation, yet He remains apart from every such notion, beyond even the subtlest speech, impossible to describe, untouched by illusion. Though He is beyond all conception, one should still lovingly form some idea of His nature. Give up attachment to worldly things and remain absorbed in the bliss of that Supreme Being.