कणाकणांत भरलेला परमात्मा
नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं । रिता ठाव या राघवेवीण नाहीं । तया पाहतां पाहतां तेंचि जालें । तेथें लक्ष आलक्ष सर्वं बुडालें ॥
आकाशामध्ये जे अणू-रेणू वावरतात, त्यांमध्येही परम-तत्त्व भरून राहिले आहे. परमेश्वरावाचून कोणतेही स्थान रिकामे नाही. त्या स्वरूपास पाहण्याचा अभ्यास करता-करता पाहणारा स्वत:च ते स्वरूप बनून जातो. त्या परमतत्त्वाचे ठायी सर्व दृश्य-अदृश्य लोप पावते व एकच ते तत्त्व उरते.
The Divine Filling Every Atom
नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं । रिता ठाव या राघवेवीण नाहीं । तया पाहतां पाहतां तेंचि जालें । तेथें लक्ष आलक्ष सर्वं बुडालें ॥
Even the tiniest particles that move through the sky are filled with the Supreme Truth; no place at all is empty of God. As one keeps practicing to behold that form, the observer himself gradually becomes that very form. In that Supreme Reality, all that is seen and unseen dissolves, and only that one truth remains.