खरा देव शोधण्याची तसदी कोणी घेत नाही
जया मानला देव तो पूजिताहे। परी देव शोधूनि कोणी न पाहे। जगीं पाहतां देव कोट्यानकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥
मनुष्य ज्याला देव मानतो, त्याची पूजा-अर्चा करीत बसतो, पण खरा देव कोणता आहे हे कोणी शोधून पाहात नाही. जगामध्ये कोट्यवधी देव-देवता आहेत. ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते त्याला तो श्रेष्ठ समजतो. खरा देव शोधण्याची कोणी तसदी घेत नाही.
Nobody Searches for the True God
जया मानला देव तो पूजिताहे। परी देव शोधूनि कोणी न पाहे। जगीं पाहतां देव कोट्यानकोटी। जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥
A person worships whatever they have accepted as God, but no one takes the trouble to search out who the true God really is. There are countless millions of gods and deities in this world, and whichever deity's devotion a person prefers, that one they consider supreme. No one bothers to seek out the real God.