खरा साधु ओळखण्याची कसोटी
नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू। नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू। नव्हे उन्मतु वेसनी संगबाधु। जगीं ज्ञानिया तोचि साधु अगाधु॥
जो जादू-टोणा करीत नाही, जो लोकांना फसवीत नाही, जो फसवून पैसे उकळणारा नाही, जो निंदा-मत्सर करणारा नाही, जो भक्ती नसणारा नाही, जो उन्मत्त नाही, जो व्यसनी नाही, जो आपल्या संगतीने दुसऱ्यास बिघडवणारा नाही. तो खरा आत्मज्ञानी होय, तोच खरा साधू होय आणि तोच खरा गुरु या पदास योग्य होय.
The True Marks of a Sadhu
नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू। नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू। नव्हे उन्मतु वेसनी संगबाधु। जगीं ज्ञानिया तोचि साधु अगाधु॥
One who does not practice sorcery, does not deceive people, does not swindle money through trickery, does not slander or envy, is not lacking devotion, is not arrogant, is not addicted to vice, and does not corrupt others through his company, he alone is a true knower of the Self, a true sadhu, and truly worthy of the position of guru.