खरा संत उपाधींनी अबाधित
करी वृत्ति जो संत तो संत जाणा। दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा। उपाधी देहेबुद्धितें वाढवीते। परी सज्जना केवि बाधूं शके ते॥
जो आत्मस्वरूपावर वृत्ती स्थिर करतो तो संत आहे, असे समजावे. त्याच्या मनात भगवंतावाचून कोणतीही वासना नसते. त्यामुळे त्याला दैन्य नसते. तो आत्मानंदात मग्न असतो. प्रपंचातील उपाधी देहबुद्धी वाढविण्यास कारण होते, परंतु ती संतांना बाधत नाही.
A True Saint Untouched by Worldly Ties
करी वृत्ति जो संत तो संत जाणा। दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा। उपाधी देहेबुद्धितें वाढवीते। परी सज्जना केवि बाधूं शके ते॥
One who fixes their disposition firmly upon the true Self should be recognized as a saint. Such a person harbors no desire apart from God, and so knows no misery, remaining absorbed instead in the bliss of the Self. Worldly attachments cause body-consciousness to grow in others, but they cannot touch or afflict such saints.