खोटा गुरु मुक्ती देऊ शकत नाही
गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी। बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी। मनीं कामना चेटके धातमाता। जनीं वेर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥
तसे पाहिले तर जगामध्ये लक्षावधी नव्हे तर कोट्यवधी गुरु आहेत. त्यांच्याजवळ अनेक प्रकारचे मंत्र असतात व शक्ती असतात. परंतु ते वासनेने लिप्त असतात. पैसा, मान-मरातब, प्रसिद्धी या गोष्टी मिळविण्यासाठी ते अनेक खोट्या गोष्टी प्रचलित करतात, जादू-टोणा करतात. असा गुरु म्हणविणारा व्यर्थ होय. तो परमेश्वराचे दर्शन घडवून मुक्ती देणारा नव्हे.
A False Guru Cannot Grant Liberation
गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी। बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी। मनीं कामना चेटके धातमाता। जनीं वेर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥
Looked at plainly, there are countless, millions upon millions, of gurus in this world, each possessing many kinds of mantras and great powers. But they remain steeped in worldly desire, spreading falsehoods and practicing sorcery to gain money, status, and fame. Such a so-called guru is worthless. He is not one who can reveal God and grant true liberation.