क्षणभंगुर सुख जाणावे
मना वीट मानूं नको बोलण्याचा । पुढें मागुता राम जोडेल कैंचा । सुखाची घडी लोटतां सूख आहे । पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ॥
हे मना, माझ्या बोलण्याचा वीट मानू नकोस. अरे, मी सांगतो तसे वागला नाहीस तर भगवंत कसा भेटेल? आज प्रपंचात सुखाचा काळ आहे, पण हा सुखाचा काळ संपल्यावर सुख कोठचे? नंतर सर्व नाहीसे होईल. काहीही उरणार नाही. हे ध्यानी घे.
Worldly Joy Does Not Last
मना वीट मानूं नको बोलण्याचा । पुढें मागुता राम जोडेल कैंचा । सुखाची घडी लोटतां सूख आहे । पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ॥
O mind, do not grow weary of my words. If you do not act as I tell you, how will you ever attain God? Today there is a time of happiness in worldly life, but once this happy time passes, where will happiness be found? Afterward everything will vanish, and nothing will remain. Keep this firmly in mind.