मनाच्या श्लोकांचे फलश्रुती
मनाची शतें ऐकतां दोष जाती । मतिमंद ते साधना योग्य होती । चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आंगीं । म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ॥
हे मनाचे श्लोक श्रवण केल्यामुळे सर्व दोष निघून जातील. जे अज्ञानी आहेत, त्यांना साधन करण्याची योग्यता लाभेल. त्यांच्या अंगी ज्ञान-वैराग्य व सामर्थ्य येईल. श्रीसमर्थ रामदास म्हणतात की, त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल.
The Fruit of Hearing These Verses
मनाची शतें ऐकतां दोष जाती । मतिमंद ते साधना योग्य होती । चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य आंगीं । म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ॥
By hearing these verses of the mind, all one's faults will disappear. Even those who are dull-witted will become fit for spiritual practice, and knowledge, detachment, and inner strength will grow within them. Shri Samartha Ramdas declares that such people will surely attain liberation.