मत्स्य-कूर्म अवतार
विधीकारणें जाहला मत्स्य वेगीं। धरी कूर्मरूपें धरा पुष्टिभागीं। जना रक्षणाकारणें नीच योनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
ब्रह्मदेवासाठी भगवंताला माशाचे रूप घ्यावे लागले. कासवाचे रूप घेऊन त्याने पाठीचा पृथ्वीला आधार दिला. अशा प्रकारे लोकांच्या रक्षणासाठी भगवंताने क्षुद्र योनीत जन्म घेण्यास मागे-पुढे पाहिले नाही. तात्पर्य, भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे व तो भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही.
The Fish and Tortoise Forms
विधीकारणें जाहला मत्स्य वेगीं। धरी कूर्मरूपें धरा पुष्टिभागीं। जना रक्षणाकारणें नीच योनी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
For Brahmadeva's sake the Lord swiftly took the form of a fish, and as a tortoise he supported the earth on his back. To protect people, the Lord never hesitated to take birth even in lowly forms. In short, the Lord is the protector of his devotees and never neglects them.