नामाने कामविजय
मुखीं राम त्या काम बाधूं शकेना। गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना। हरीभक्त तो शक्त कामास मारी। जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥
ज्याच्या मुखात राम-नाम असते त्याला काम-वासना बाधू शकत नाही. त्या मनुष्यास आपल्या सद्गुणांमुळे काम-विकाराशी लढण्याचे धैर्य प्राप्त होते. जो भगवंतांचा भक्त असतो तो काम-विकारास मारण्यास समर्थ असतो. असा ब्रह्मचारी मारुती हा जगामध्ये धन्य होय.
The Name Conquers Desire
मुखीं राम त्या काम बाधूं शकेना। गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना। हरीभक्त तो शक्त कामास मारी। जगीं धन्य तो मारुती ब्रह्मचारी॥
One who keeps Rama's name on his lips cannot be troubled by lustful desire. Through his own good qualities, such a person gains the courage to fight against passion. A true devotee of Hari is capable of conquering desire. Blessed in this world is such a celibate devotee as Maruti.