नामावर अविश्वास घातक
जया नावडे नाम त्या येम जाची। विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची। म्हणोनी अती आदरें नाम घ्यावें। मुखें बोलतां दोष जाती स्वभावें॥
ज्याला राम-नाम आवडत नाही, त्याला यमराज यातना देतो. ज्या मनुष्याच्या मनात नामाबद्दल संशय निर्माण होतो आणि जो तर्क करीत बसतो, अरेरे! त्याला नरकाचे दु:ख भोगावे लागते. म्हणून अत्यंत आदराने रामनाम घ्यावे. मुखाने नाम घेतले म्हणजे दोष आपोआप नाहीसे होतात.
Doubting the Name Brings Ruin
जया नावडे नाम त्या येम जाची। विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची। म्हणोनी अती आदरें नाम घ्यावें। मुखें बोलतां दोष जाती स्वभावें॥
Whoever dislikes Ram's name is tormented by Yama. Whoever harbors doubt about the name and keeps arguing over it must, alas, suffer the pains of hell. So take Ram's name with the utmost reverence; uttering it with the mouth makes one's faults vanish on their own.