नामस्मरण - सर्वश्रेष्ठ साधन
समस्तामधें सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधून पाहें। जिवा संशयो वाउगा तो तजावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
ईश्वर-प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये नाम-स्मरण हे खरोखर श्रेष्ठ साधन आहे. हे जर पटत नसेल, तर सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये पाहावे. श्रुती, स्मृती, पुराण, संतांची वचने या सर्वांमध्ये नाम-स्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. मनामधला अयोग्य संशय काढून टाकावा व पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे.
Chanting the Name, the Supreme Path
समस्तामधें सार साचार आहे। कळेना तरी सर्व शोधून पाहें। जिवा संशयो वाउगा तो तजावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा॥
Among all the means of attaining God, remembrance of the name is truly the most excellent. If this is hard to accept, look it up in all the sacred scriptures — the Shrutis, Smritis, Puranas, and the words of saints all proclaim the greatness of chanting the name. So cast away misplaced doubt and meditate on Ram at dawn.