निष्काम भक्ती व द्वंद्वातीत स्थिती
करी काम नि:काम या राघवाचें। करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे। करीं छेद निर्द्वंद्व हे गुण गातां। हरीकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां॥
भगवंताबद्दल आसक्ती निर्माण झाली की मनुष्य विरक्त बनू लागतो. तो निष्काम कर्म करू लागतो. सर्व जीव हे ब्रह्मस्वरूप असल्याचे ज्याला ज्ञान होते. तो मनुष्य भगवंताचे गुणगान करू लागला की भेदभाव नाहीसे होतात व सुख-दु:ख या द्वंद्वांच्या पलीकडे पोहोचतो. भगवंतांच्या कीर्तनामध्ये विश्वास जडला की असे घडते.
Desireless Devotion Beyond Duality
करी काम नि:काम या राघवाचें। करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे। करीं छेद निर्द्वंद्व हे गुण गातां। हरीकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां॥
When love for God takes root, a person grows detached and begins to act without craving results. Realizing that all beings are but forms of Brahman, he sings God's praises, and difference dissolves as he rises above the pairs of pleasure and pain. This happens when one's faith becomes firmly rooted in singing the Lord's glories.