नृसिंह अवतार
महां भक्त प्रह्लाद हा कष्टविला। म्हणोनी तयाकारणें सिंह झाला। न ये ज्वाळ वीषाळ संनिध कोण्ही। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
प्रल्हाद हा मोठा भक्त होता. हिरण्यकशिपूने त्याचा छळ मांडला, तेव्हा त्याच्यासाठी भगवंत हा सिंह बनला. त्याच्या अंगातून त्या वेळी प्रचंड ज्वाळा निघत होत्या. त्याच्याजवळ कोणीही जाऊ शकत नव्हते. भगवंत हा भक्तांचा कैवारी आहे. तो आपल्या भक्ताची उपेक्षा कधीही करीत नाही.
The Man-Lion Avatar
महां भक्त प्रह्लाद हा कष्टविला। म्हणोनी तयाकारणें सिंह झाला। न ये ज्वाळ वीषाळ संनिध कोण्ही। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥
Prahlad was a great devotee. When Hiranyakashyapu tormented him, the Lord became a lion for his sake. Enormous flames blazed from his body, so fierce that no one could come near him. The Lord is the protector of his devotees and never neglects them.