पूर्वकर्मानुसार भोग
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ? विचारें मना तूंचि शोधूनि पाहें । मना त्वां चि रे पूर्वसंचीत केलें । तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ॥
हे मना, या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे, ते तूच विचार करून शोधून काढ. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्व जन्मी जे कर्म केलेले आहे, त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावे लागते.
pocketpage.in
Fruits of Past Deeds
जनीं सर्वसूखी असा कोण आहे ? विचारें मना तूंचि शोधूनि पाहें । मना त्वां चि रे पूर्वसंचीत केलें । तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ॥
O mind, search and find for yourself who in this world is happy in every possible way. In truth, no one is happy in every way. Whatever deeds you performed in a past life, their fruits accordingly must be experienced in this one.
pocketpage.in