साक्षीभावाने राहावे सुखी
भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे। परी सर्व ही सर्वरुपीं न साहे। मना भासलें सर्व कांहीं पहावें। परी संग सोडूनि सूखी रहावें॥
पंचमहाभूते, पिंड (जीव) व ब्रह्मांड यांच्यामध्ये ऐक्य आहे. परंतु शाश्वत अशा आत्मस्वरुपात त्यांना स्थान नाही. हे मना, अनुभवाला येते ते पाहात जावे, परंतु ते पाहताना साक्षीभाव ठेवावा व त्यात लिप्त होऊ नये. अशा प्रकारे स्वानंदामध्ये मग्न होऊन सुखी बनावे.
Witness Everything, Stay Unattached and Happy
भुतें पिंड ब्रह्मांड हें ऐक्य आहे। परी सर्व ही सर्वरुपीं न साहे। मना भासलें सर्व कांहीं पहावें। परी संग सोडूनि सूखी रहावें॥
The elements, the individual being, and the universe are all one in essence, yet none of them has a place in the eternal nature of the Self. Mind, observe whatever appears in experience, but while observing, keep the attitude of a witness and do not become attached to it. In this way, remain absorbed in the bliss of the Self and stay happy.