संकटी धावून येणारा हरि
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटीं स्वामि तैसा । हरिभक्तिचा घाव गाजे निशाणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
अंधारामध्ये चक्रवाक पक्ष्याची जोडी विरहाच्या संकटामुळे फार दु:खी होते. सूर्य प्रकट होऊन त्यांना संकटातून सोडवितो. त्याप्रमाणे संकटातून प्रसंगी भक्तास सोडविण्यासाठी भगवंत धावून येतो. हरि-भक्तीचा डंगोरा सांगत आहे की, भक्ताभिमानी भगवंत भक्तांची उपेक्षा कधीही करीत नाही.
Hari Rushes to the Rescue
सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटीं स्वामि तैसा । हरिभक्तिचा घाव गाजे निशाणीं । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
In darkness the pair of chakravaka birds suffer greatly from the anguish of separation, until the sun rises and rescues them from their distress. In just the same way, the Lord rushes in to rescue his devotee from trouble. The drumbeat of devotion to Hari proclaims that the devotee-loving God never neglects his devotees.